इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे येथे स्वारगेट बस स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर अत्याचाराची संतापजनक घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या घटनेनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य शासनावर जोरदार टीका केली आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, स्वारगेट बस स्थानकातील धक्कादायक घटना आहे. पुणे पोलिसांचा, एसटी प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा कळस आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे आरोपी अजून पोलिसांना सापडला नाही. महायुतीतील माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाचे विमान शोधून काढणारे पुणे पोलिस आज पहाटे घडलेल्या या घटनेतील आरोपी अजूनही जेरबंद करू शकत नाहीत, ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे.
राज्याचे गृहखाते महिला सुरक्षेच्या बाबतीत आणखी किती ढिसाळ कामगिरी करणार ? एसटी प्रशासन जबाबदारी घेणार का? इतक होत असताना स्वारगेट बस स्थानकात कर्मचारी काय करत होते? परिवहन मंत्री कुठे आहेत? असे प्रश्नही त्यांनी उपस्थितीत केले आहे.