पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्यातील एका नामांकित इंग्रजी शाळेत एका शिक्षिकेने आपल्या दहावीच्या विद्यार्थ्यांवर शाळेच्या स्टाफ रुममध्येच लैगिंक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील गंज पेठ भागात ही शाळा आहे.
या प्रकरणातील शिक्षिकेनेच तिच्या विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी लैगिंक प्रकरणात बालकाचं संरक्षण करणा-या ७,९,११,६,१२,१४ कलमातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगा दहावी इयत्तेत असून तो प्रिलियम परिक्षेसाठी शाळेत आला होता. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला.
या शिक्षिकेने परिक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्याला उत्तेजित केलं व आपल्यासोबत स्टाफ रुममध्ये घेऊन गेली. शाळेच्या मुख्याध्यापकांना स्टाफ रुममध्ये सुरु असलेल्या प्रकाराची माहिती मिळताच ते तिथे गेले व रंगेहाथ शिक्षिकेला पकडलं. शाळा व्यवस्थापनाने मुलाच्या कुटुंबियांना या बदद्दल माहिती दिल्यानंतर मुलाच्या आईने खडक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. त्यानंतर गुन्हा दाखल करुन शिक्षिकेला अटक कऱण्यात आली.