पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पती पत्नीचे नाते ही अत्यंत पवित्र मानले जाते, परंतु या नात्यांमध्ये संशय निर्माण झाला त्यातून केवळ दुरावाच नाही तर दुर्घटना देखील घडू शकते. गेल्या काही वर्षांमध्ये नातेसंबंधात प्रेम, जिव्हाळा, स्नेह विश्वास वाढण्याऐवजी तो कमी होत चालला आहे. किंबहुना नात्यांमध्ये दुरावा वाढून ती तुटत चालली आहेत. साहजिकच घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. इतकेच नव्हे तर एकमेकांचे जीव घेण्याचे पर्यंत मजल जात आहे.
पेट्रोल टाकून जाळले
पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर या ठिकाणी अशीच एक भयानक घटना घडली. एका महिलेने चक्क आपल्या पतीचा निर्घृण खून केला, याला कारण म्हणजे तिचा पती मुलीच्या प्रेमाला विरोध करत होता, त्याचप्रमाणे तो तिच्या स्वतःच्या प्रियकराबरोबरच्या संबंधाच्या आड येतो, असे तिला वाटत होते. त्यातूनच घटना घडली. विशेष म्हणजे त्या महिलेने पतीला ठार मारून त्याला पेट्रोल टाकून जाळून त्याचे नामोनिशाण ठेवले नाही, यासाठी तिने वेब सिरीज बघून जणू काही त्याचीच मदत घेतली.
अल्पवयीन मुलीचं प्रेमप्रकरण यशस्वी करण्यासाठी आईनेच मुलीच्या बापाचा म्हणजे स्वतःच्या पतीचा खून करण्याची घटना अत्यंत वाईट म्हणता येईल, अशी आहे. आता मात्र या प्रकरणात पतीची हत्या केल्याबद्दल पत्नीला कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे. जॅाय लोबो असे मृताचे नाव असून पत्नी सॅन्ड्रा लोबो आणि तिच्या मुलीचा प्रियकर ॲग्नेल कसबे यांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
दोन आरोपींना अटक
सॅन्ड्रा लोबो आणि जॅाय लोबो हे पती पत्नी असून १७ वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना एक अल्पवयीन मुलगी आहे. या मुलीचे ॲग्नैल कसबे नावाच्या मुलांसोबत प्रेमसंबंध होते. अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध असल्याचे समजल्यावर जॅाय लोबो याने पत्नी, मुलगी आणि तिचा प्रियकर या तिघांना मारहाण केली होती. त्यावरून जॅाय लोबो याचा तिघांनी मिळून काटा काढण्यासाठी घरात चाकूने खून केला.
एक दिवस घरातच मृतदेह ठेऊन नंतर रात्री सणसवाडीला नेऊन पेट्रोल टाकून पेटवून दिला. मुलीचे प्रेम प्रकरण लपवण्यासाठी व स्वतःच्या प्रेम संबंधामध्ये अडथळा न येण्यासाठी आईनेच मुलीच्या प्रियकराच्या मदतीने हा खून केला आहे. विशेष म्हणजे पतीचा खून करत पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह पेट्रोल टाकून जाळला. या प्रकरणी शेकडो सीसीटीव्ही तपासत पोलिसांनी या दोन आरोपींना अटक केली आहे. आणखी भयानक म्हणजे जॅायचा खून करण्याआधी पत्नीने व मुलीने क्राईम वेब सिरीज पाहून हा कट रचला होता.
Pune Crime Murder Husband Wife