पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात दररोजच गुन्हेगारीच्या अनेक घटना उघडत आहेत, त्यामुळे पुणे शहर हे शिक्षण किंवा विद्येची केंद्र म्हणण्या ऐवजी आता गुन्हेगारीचे केंद्र म्हटले जात आहे. त्यातच हाणामारी, चोऱ्या सारख्या घटनांबरोबरच महिलांवरील अत्याचारही वाढले आहेत, त्यातच एक भयानक घटना समोर आली आहे. ती म्हणजे एका कर्जदाराने खासगी सावकाराचे कर्ज परत केले नाही म्हणून त्या सावकाराने कर्जदाराच्या पत्नीवरच बलात्कार केला इतेकच नव्हे तर त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर आता व्हायरल होत असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कारण या भयानक प्रकाराचा व्हिडीओ तयार करुन हा व्हिडीओ आरोपीने सोशल मीडियावर व्हायरल केला होता. पुण्यातील हडपसर परिसरात या वर्षीच फेब्रुवारी मध्ये ही घटना घडली होती.
उसन्या पैशांसाठी
या भयानक प्रकरणाची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिलेच्या पतीला आरोपीने उसने पैसे दिले होते. उसने घेतलेले हे पैसे फिर्यादीचा पती परत करु शकला नाही. त्यामुळे आरोपी इम्तियाज हसीन शेख (वय ४७) याने फिर्यादी आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देत हडपसर येथील एका कॉलनीत बोलावून घेतले. त्यानंतर तक्रारदार महिलेच्या पतीला समोर बसून चाकूचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी दिली. इतकेच नव्हे तर कर्जदार इसमाच्या ३४ वर्षीय पत्नीसोबत तिच्या पतीसमोरच जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आरोपीने मोबाईल कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड देखील तयार केला. त्यानंतर पुन्हा आरोपीने फिर्यादी महिलेकडे शरीरसंबंधाची मागणी केली. मात्र महिलेने नकार दिल्याने आरोपीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला केला. यानंतर महिलेने हडपसर पोलीस स्टेशन गाठत तक्रार नोंदवली. त्यानुसार आरोपी याच्याविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.