नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजच्या काळात मुलगा आणि मुलगी असा भेद केला जात नाही असे म्हटले जाते, परंतु आजही समाजात मुलगाच पाहिजे, असा अट्टाहास असलेली काही कुटुंबे आढळतात. त्यामुळे या घरात मुलींचा जन्म झाला, तर त्यांचा छळ होतो. त्यातूनच काही वेळा त्या बालिकांच्या बळीही घेण्यात येतो. पुणे शहरात अशीच एक भयानक घटना घडली. जुळ्या मुलींना झोपेत बाहेरचे दूध पाजवल्याने त्यांचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आता न्यायालयाच्या आदेशानुसार हडपसर पोलिसांनी वडील आणि आजोबा यांच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या घटना एकाच वेळी न घडता दोन महिन्यांनी घडल्या.
शारीरिक व मानसिक छळ
आजच्या काळातही महिलेचा मुलगी झाला तर महिलेचा छळ होतो असे दिसून होतो असे दिसून येते. यातूनच दोन जुळ्या मुलींचा आजोबा आणि वडिलांनी एकप्रकारे बळी दिला असे उघड झाले आहे. या भयानक प्रकरणाविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी श्रीकृष्णा लोभे (वय ३५, रा. वाघोली) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून मुलींचे वडील अतुल सूर्यवंशी आणि आजोबा बाबासाहेब सूर्यवंशी (वय ६२, सर्व रा. फुरसुंगी) यांच्यासह चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २६ नोव्हेंबर २०१९ आणि ६ फेब्रुवारी २०२० रोजी घडला. फिर्यादी यांची बहिण ऊर्मिला यांना मुलगाच पाहिजे, या कारणामुळे त्यांचा सासरी मानसिक छळ केला जात होता. मुले गोरी व्हावीत, यासाठी त्यांना गोळ्या खाण्यास दिल्या. त्यानंतरही त्यांना जुळ्या मुली झाल्या. त्यामुळे घरच्या मंडळींचा संताप झाला होता.
न्यायालयात धाव
जुळ्या मुली झाल्यामुळे बिचारी महिला रुसून गेली त्यातच तिला सासरच्या मंडळी बद्दल भीती वाटत होती. बाळंतपणानंतर सहा महिन्यांनी त्या जुळ्या मुलींसह सासरी परतल्या. परंतु आरोपींनी २६ नोव्हेंबर २०१९ रोजी सात महिन्यांची मुलगी सिद्धी ही झोपेत असताना तिला बाहेरील दूध पाजले. ते दूध श्वासनलिकेत गेल्यामुळे तिचा मृत्यू झाला. त्यानंतर ६ फेब्रुवारी २०२० रोजी नऊ महिन्यांची दुसरी मुलगी रिद्धी हिचाही त्याच पद्धतीने खून केला.याबाबत फिर्यादीने पोलिस ठाण्यात तक्रार केली. मात्र, पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार हडपसर पोलिसांनी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही घटनांमध्ये साम्य असून या प्रकरणामुळे पोलीसही चक्रावले आहेत.