पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघे ६५ लाख मूल्य असलेले हिरे तब्बल ४ कोटींना विकण्यात आले. याद्वारे फसवुणकीचा प्रकार पुणे येथे उघडकीस आला आहे. संबंधित ग्राहकाने या दागिन्यांची पुनर्विक्री करण्यासाठी दागिने शोरुममध्ये नेले असता त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी ग्राहकाने केलेले तक्रारीनुसार, गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
पुणे शहरातील लोणी काळभोर येथील स्वाती हेमंत हडके यांनी लक्ष्मी रोडवर असलेल्या तनिष्काच्या शोरुममधून हिऱ्यांचे दागिने खरेदी केले. या दागिन्यांची किंमत ४.१४ रुपये होती. त्यासंदर्भातील बिलसुद्धा त्यांना देण्यात आले. डिसेंबर २०१८ ते जानेवारी २०२२ या कालावधीत एका योजनेचे सदस्यत्व त्यांनी घेतले होते. त्यामाध्यमातून हे हिऱ्यांचे दागिने घेण्यात आले. मग जानेवारी २०२३ मध्ये हे दागिने देऊन दुसरे नवीन दागिने घेण्याचा त्यांनी विचार केला. त्यासाठी ते परत शोरुममध्ये गेले. परंतु त्यांना टाळाटाळ करण्यात आली.
वारंवार आग्रह करुनही त्यांचे ते दागिने घेतले जात नव्हते. यामुळे हडके यांनी तनिष्काच्या दुसऱ्या शाखेत ते दागिने दाखवले. त्यावेळी त्या दागिन्यांची किंमत फक्त ६५.७६ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. दागिने विक्रीतून त्यांची ३ कोटी ४८ लाखांत फसवणूक करण्यात आली. स्वत:सोबत झालेल्या फसवणुकीबाबत हडके यांनी पोलिसांत तक्रार दिली. तसेच तनिष्का शोरुमकडेही तक्रार नोंदविली. त्यानंतर कंपनीने त्यांच्या स्तरावर संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली. त्यानुसार, तनिष्का शोरुमकडून या प्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच सहा जणांची भूमिका तपासली जात आहे.
चार वर्षांत २८ कोटी होण्याची केली बतावणा
हडके यांनी मुलीच्या लग्नासाठी सोय म्हणून दागिने घेतले होते. या गुंतवणुकीची किंमत चार वर्षात २८ कोटी रुपये होईल, असे त्यांना सांगण्यात आले होते. मात्र, दागिने घेण्यास लक्ष्मी रोड शाखेकडून टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे त्यांनी हडपसर येथील तनिष्क ज्वेलरी स्टोअरमध्ये तपासणी केली. त्यावेळी फसवणुकीचा संपूर्ण प्रकार उघड झाला.