पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यवत गावाच्या बाहेर भीमा नदीच्या परगाव पुलाजवळ गेल्या आठवड्यात सात मृतदेह आढळले होते. सातही जणांच्या शरीरावर कुठलाच मार नसल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी लावला होता. मात्र आज ही आत्महत्या नसून हत्या असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
एकाच कुटुंबातील पाच सदस्य आणि मुलगी व जावई अशा सात जणांचे मृतदेह नदीच्या पात्रात आजुबाजुला सापडले होते. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता कुणाच्याच शरीरावर मार असल्याचे चिन्ह नव्हते. अश्यात कुठल्यातरी कारणाने सातही जणांनी एकाचवेळी आत्महत्या केली असू शकते, असा अंदाज पोलिसांनी लावला. यात कुटुंबातील मुलगी गावातल्या एका मुलासोबत गायब होती आणि त्याच कारणाने अपमानापोटी आत्महत्या केली असू शकते, असे पोलिसांना वाटले. पण आज सात दिवसांनी असे काहीच झालेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. चुलत भावाने सातही जणांना मारून त्यांचे मृतदेह नदीत फेकून दिल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका महिलेलाही अटक केली आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासाची दिशाच बदलली आहे. अर्थात गेला आठवडाभर पोलिसांनी जो काही तपास केला त्यातच ही माहिती हाती लागली आहे.
सहा जणांना अटक
या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. यात एका महिलेचा समावेश असून एक जण अजूनही फरार आहे. हे सगळे लोक मृतांचे नातेवाईक असून त्यांनी संपत्तीच्या वादातून हा प्रकार केल्याचे लक्षात आले आहे. त्यांनी काहीतरी खायला देऊन सात जणांना बेशुद्ध केले आणि त्यानंतर त्यांना नदीत फेकून दिले. यामध्ये सातही जणांचा नदीत बुडून मृत्यू झाला.
Pune Crime & Dead Bodies Murder Police Investigation