पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकेकाळी शहरातील नामवंत बांधकाम व्यावसायिक म्हणून डी.एस. कुलकर्णी हे डी.एस.के बिल्डर्स म्हणून ओळखले जात होते, “घराला घरपण देणारी माणसं” हे डी.एस.के यांचे घोषवाक्य प्रसिद्ध झाले होते. त्यांनी अनेक उद्योगांमध्ये पाय पसरले आणि त्यांच्या उद्योगांचा वार्षिक टर्न ओव्हर १६०० कोटी रूपयांचा होता मात्र गुंतवणूकदारांचे ८०० कोटी रुपये थकविल्याप्रकरणी तसेच अन्य गैरव्यहार झाल्याच्या आरोपावरून त्यांना ५ वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती, आता कुलकर्णी यांना जामीन मंजूर झाला आहे. जामिनावर सुटका झाली आहे. यासंदर्भात चर्चा चालू असून गुंतवणूकदारांचे पैसे केव्हा मिळणार यासंदर्भात विचारणा होत आहे.
कुटुंबिय व नातेवाईकांना अटक
तब्बल ५ वर्षांनंतर कुलकर्णी हे तुरुंगातून बाहेर आलेले आहेत, सर्व सामान्य गुंतवणूकदारांना जास्त पैशांचे आमिष दाखवून त्यांनी हजारो गुंतवणूकदारांना एकूण ८०० कोटींना फसवल्याचा त्याच्यावर आरोप होता. त्यानंतर त्यांना सन २०१८मध्ये डी.एस.कुलकर्णी व त्यांची पत्नी व मुलगा, मेव्हणे व जावाई व कंपनी मधील काही लोकांना अटक करण्यात आली होती. तसेच कायद्याखाली त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, त्या कायद्यान्वये किती काळ तुरुंगात ठेवता येते, हे न्यायालयाने पाहिल्यानंतर मग पाच वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर त्यांना जामीन मिळाला आहे.
एवढ्या कोटींचे कर्ज
डी. एस. कुलकर्णी वेगवेगळ्या बॅकाकडून एकूण १ हजार २०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. याच कर्ज प्रकरणांत राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाऱ्याला देखील अटक करण्यात आली होती. याप्रकरणी सरकारने यामध्ये लक्ष घालून गुंतवणूकदादांचे गुंतलेले पैसे परत द्यावे अशी देखील मागणी गुंतवणूक दरांची होती. आता डी.एस.कुलकर्णी बाहेर आल्यावर गुंतवणूक दारांचे पैसे मिळणार का.? असा प्रश्न विचारला जात आहे.
गुंतवणूकदारांना किती पैसे मिळाले
या प्रकरणातील महत्त्वाची बाब म्हणजे, या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये कोणत्याही गुंतवणूकदारांचा एक रुपयाही परत मिळालेला नाही. डी. एस. कुलकर्णी यांच्या एकूण ३३५ मालमत्ता आहेत. गृह प्रकल्प, मोकळ्या जागा आणि डी. एस. के. ड्रीम सिटीसारखा ३०० एकरांमधील प्रकल्प असे विविध प्रकल्प कुलकर्णींकडे आहेत, यातील बहुतांश प्रकल्पांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र लिलावामधील एक रुपयाही गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचलेला नाही. खरे म्हणजे कुलकर्णी यांना अटक झाल्यानंतर नवीन घोटाळ्याला सुरुवात झाली, असा आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे.
मालमत्ता विक्री
डी. एस. कुलकर्णींच्या मालमत्ता कवडीमोल किमतीला खरेदी करायचे आणि मिळालेले पैसे बँकांकडे वळते करायचे, असा प्रकार सुरू असल्याचे गुंतवणूकदार म्हणत आहेत. कारण डी. एस. कुलकर्णींनी जसे गुंतवणूकदारांकडून पैसे घेतलेले, तसेच विविध बँकांकडून देखील घेतले होते. कुलकर्णींवर बँकांचेही सुमारे १२०० कोटी रुपयांचं कर्ज आहे. या सर्व प्रकारात बँकांचाही सहभाग असल्याचे पोलिसांना सुरुवातीला आढळून आले होते, त्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यालाही अटक करण्यात आली होती. कुलकर्णींची मालमत्ता विकून बँकांना सर्वात आधी रक्कम दिली जात आहे. यामुळे मालमत्ता लिलाव करून गुंतवणूकदारांना सर्वात आधी पैसे द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
Pune Crime Builder DSK Kulkarni Bail Investor Fraud
DS Real Estate Property Bank Crore