शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणात पुण्यातून आणखी एकाला अटक

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 6, 2024 | 7:41 pm
in संमिश्र वार्ता
0
jail1

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, गौरव विलास अप्पुने (वय २३) नावाच्या व्यक्तीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. त्याचा या प्रकरणात सहभाग असल्याच्या घटनेला दुजोरा देण्यात आला. त्याला हत्येची पूर्ण माहिती असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील ही १६वी अटक आहे.

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की तपासादरम्यान हत्येचा कट रचण्यासाठी गौरव हा अनेकदा इतर आरोपींना भेटला होता. शूटर्सच्या पहिल्या बॅचच्या तो संपर्कात होता. याआधी बाबा सिद्दीकी यांना मारण्याची सुपारी ज्यांनी दिली होती, त्यांच्या तो संपर्कात होता. गुन्हे शाखेचे पथक गौरवला न्यायालयात हजर करणार आहे. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.

बाबा सिद्धीकी यांची १२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील वांद्रे येथे मुलगा झिशान यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. सिद्धीकी यांचे अभिनेता सलमान खानशी जवळचे संबंध असल्याने त्यांची हत्या करण्यात आली आहे. याच दरम्यान आता सिद्धीकी यांच्या हत्याकांडातील एका साक्षीदाराला पाच कोटींची खंडणी आणि धमकीचा फोन आला होता. साक्षीदाराने पोलिसांना सांगितले, की काही दिवसांपूर्वी त्याला एका अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आला होता. त्यात पाच कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी फोन करणाऱ्याने दिली होती. पोलिस फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. या प्रकरणी आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेला मंजूरी; २२ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Next Post

या व्यक्तींनी मनामध्ये मरगळ आणू नये, जाणून घ्या, गुरुवार, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी मनामध्ये मरगळ आणू नये, जाणून घ्या, गुरुवार, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011