पुणे – पुणे विभागातील १७ लाख १९ हजार ४६४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १८ लाख २ हजार १२३ झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या ४५ हजार ४४८ इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण ३७ हजार २११ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण २.०६ टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण ९५.४१ टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण १० लाख ७१ हजार ४३७ रुग्णांपैकी १० लाख ४३ हजार ३७१ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण ९ हजार ९९४ आहे. कोरोनाबाधित एकूण १८ हजार ७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण १.६९ टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण ९७.३८ टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण २ लाख ८ हजार ५९१ रुग्णांपैकी १ लाख ९५ हजार ११९ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ८ हजार ४२९ आहे. कोरोनाबाधित एकूण ५ हजार ४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण १ लाख ७० हजार ५३७ रुग्णांपैकी १ लाख ६३ हजार १९६ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या २ हजार ८६१ आहे. कोरोनाबाधित एकूण ४ हजार ४८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण १ लाख ६४ हजार ६४६ रुग्णांपैकी १ लाख ४९ हजार ६१० रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या १०हजार ६४१ आहे. कोरोनाबाधित एकूण ४ हजार ३९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण १ लाख ८६ हजार ९१२ रुग्णांपैकी १ लाख ६८ हजार १६८ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या १३ हजार ५२३ आहे. कोरोनाबाधित एकूण ५ हजार २२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये ५ हजार ८४९ ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात १ हजार १५२, सातारा जिल्ह्यात ८२१, सोलापूर जिल्ह्यात ३९१, सांगली जिल्ह्यात १ हजार ११० तर कोल्हापूर जिल्ह्यात २ हजार ३७५ अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण ५ हजार ९३ आहे. पुणे जिल्हयामध्ये १ हजार ३२८, सातारा जिल्हयामध्ये ८९७, सोलापूर जिल्हयामध्ये ३५३, सांगली जिल्हयामध्ये ९५७ व कोल्हापूर जिल्हयामध्ये १ हजार ५५८ रुग्णांचा समावेश आहे.
विभागातील लसीकरणाचे प्रमाण
पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये ५० लाख ५१ हजार ८५४, सातारा जिल्ह्यामध्ये ११ लाख १७ हजार ६७६, सोलापूर जिल्हयामध्ये ८ लाख ५७ हजार ८७१, सांगली जिल्हयामध्ये १० लाख २२ हजार ६०९ तर कोल्हापूर जिल्हयामध्ये १५ लाख ३४ हजार ८९५ नागरिकांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण १ कोटी १९ लाख ९० हजार ३९४ नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी १८ लाख २ हजार १२३ नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
(टिप :- दि. १८ जुलै २०२१ रोजी रात्री ९ वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)