पुणेरी पाट्या, पोस्टर, विनोद आणि अन्य बाबी खुपच प्रसिद्ध आहेत. त्यामुळेच त्याची नेहमी मोठी चर्चा होत असते. सध्या एक पोस्टर सोशल मिडियात प्रचंड व्हायरल झाले आहे. हे पोस्टरही पुणेरी स्टाईलच आहे. त्यामुळे सहाजिकच त्यावर अनेक हास्य-विनोद, टीका-टिपण्णी आणि बऱ्याच काही बाबी सोशल मिडियात घडत आहेत. पावसाळ्याला सुरुवात झाल्याने त्यावर आधारीत हे पोस्टर आहे. राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पुण्यात चक्क मोफत छत्री दुरुस्ती उपक्रम सुरू केल्याचे या पोस्टरमध्ये म्हटले आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे त्यात नमूद केले आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचे फोटोही या पोस्टरवर लावण्यात आले आहेत. त्यामुळे ही बाब सोशल मिडियामध्ये खुपच रंगली आहे. काँग्रेस सारख्या पक्षाला अशा प्रकारचा उपक्रम का घ्यावा लागला इथपासून तर नादुरुस्त छत्री ऑनलाईन दुरुस्त होणार का, अशा विविध प्रकारच्या पोस्ट सध्या सोशल मिडियात खुमासदार चर्चा घडवित आहेत.
बघा हे व्हायरल पोस्टर