रविवार, ऑक्टोबर 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पुण्याचा कचरा प्रश्न निघणार निकाली… ८० वाहनांचे लोकार्पण… १७७ वाहने लवकरच येणार… असे आहे नियोजन

एप्रिल 4, 2023 | 5:28 am
in राष्ट्रीय
0
3 3 1140x570 1

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे महानगरपालिकेतर्फे कचरा संकलन करण्यासाठी भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या ८० वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ही वाहने शहर स्वच्छता आणि पर्यावरणाच्यादृष्टीने उपयुक्त ठरतील, असा विश्वास श्री.पाटील यांनी व्यक्त केला.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, उपायुक्त आशा राऊत, महेश डोईफोडे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, कार्यकारी अभियंता गणेश उगले, कनिष्ठ अभियंता आशिष कोळगे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील यांनी शहरातील कचरा संकलनाविषयी माहिती घेतली. ओला आणि सुका कचरा वेगळा संकलीत करून सर्व कचऱ्यावर प्रक्रीया होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी या नव्या वाहनांचा उपयोग होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महापालिकेतर्फे ओला व सुका कचरा संकलनासाठी स्वतंत्र वाहनांचा उपयोग करण्यात येत असून १०० टक्के कचऱ्यावर प्रक्रीया करण्यात येत आहे. कचरा संकलन प्रक्रीयेसाठी १०८ लहान वाहने, ९३ ओला कचरा संकलक वाहने आणि सुक्या कचऱ्यासाठी ५६ कॉम्पॅक्टर अशी एकूण २५७ वाहने भाडेतत्वावर घेण्यात येत आहे. त्यापैकी ८० वाहनांचे लोकार्पण करण्यात आले असून उर्वरीत महिन्याभरात महापालिकेच्या सेवेत दाखल होतील. महापालिकेची ५१८ वाहने पूर्वीपासून कार्यरत असून नवी वाहने आल्यानंतर शहरातील कचरा पूर्ण क्षमतेने एकत्रित करण्यात येईल. शहरात २५ ठिकाणी या कचऱ्यावर प्रक्रीया करण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

शहरात दैनंदिन सुमारे २ हजार १०० मे.टन घनकचरा निर्माण होतो. निर्माण झालेला कचरा महापालिकेमार्फत संकलीत करून त्याची विल्हेवाट लावण्यात येते. त्यासाठी ही नवी वाहने भाडेतत्वावर घेण्यात आली आहेत. या सर्व वाहनांवर जीपीएस आणि आरएफआयडी उपकरणे बसविण्यात आली असून वाहनांच्या कामांची नोंद महानगरपालिकेतील नियंत्रण कक्षाद्वारे घेण्यात येणार आहे. या वाहनांवर ७ वर्षासाठी सुमारे ३२५ कोटी खर्च होणार आहे.

सर्व वाहने बीएस-६ प्रदूषण मानांकनाची असून त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. रिफ्यूज कलेक्टर (ओल्या कचऱ्यासाठीचे वाहन) वाहनाचे कचरा एकत्रित केल्यानंतरचे वजन १४ मे.टन असून कचरा वाहून नेण्यासाठी वाहनावर ७ क्यु.मीटरचा कंटेनर आहे. वाहनावरील हायड्रोलिक यंत्रणेमुळे मानवी हस्तक्षेप कमी होण्यास मदत होणार आहे.

लहान वाहनांचे कचरा संकलनानंतरचे वजन २.५ मे.टन तर कॉम्पॅक्टर वाहनाचे १८.५ मे.टन आहे. कॉम्पॅक्टर वाहनावर १४ क्यू.मीटर क्षमतेचा कंटेनर बसविण्यात आला आहे. या वाहनात लहान घंटागाड्यांमधून कचरा संकलीत करण्यात येईल. ही वाहने संपूर्ण बंदिस्त स्वरुपात कचरा वाहतूक करणार आहेत.

पालकमंत्र्यांची शहरातील विकासकामांना भेट
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे महानगरपालिकेतर्फे जायका प्रकल्पांतर्गत उभारण्यात येत असलेल्या डॉ. नायडू मैलापाणी शुद्धीकरण केंद्राच्या कामास भेट देऊन पाहणी केली.
यावेळी मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, सांडपाणी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता जगदीश खानोरे आदी उपस्थित होते.

प्रकल्पाचे काम नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावे व सांडपाणी शुद्धीकरणासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. प्रक्रीया केलेल्या पाण्याच्या पुनरुपयोगाबाबत आतापासून नियोजन करावे, अशा सूचना यावेळी पालकमंत्री श्री.पाटील यांनी दिल्या.

या प्रकल्पाची क्षमता १२७ द.ल. लिटर प्रतिदिन असून प्रकल्पाच्या माध्यमातून वर्षाला ४ कोटी रुपयांची वीज निर्माण होणार आहे. ही वीज महापालिका उपयोगात आणणार असल्याने वीज खर्चात बचत होणार आहे. शहरात विविध ठिकाणी असे प्रकल्प उभारण्यात येत असून २०२५ अखेरपर्यंत नदीत प्रक्रीया केलेले पाणीच सोडण्यात येईल. प्रकल्पातून तयार होणाऱ्या पाण्याचा उद्योगासाठीदेखील वापर करता येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या कामास भेट
पालकमंत्री श्री.पाटील यांनी बंडगार्डन येथील मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या कामाचीदेखील यावेळी पाहणी केली. नदीच्या दोन्ही बाजूस स्थानिक प्रजातीची झाडे लावण्यात यावी. नदी किनाऱ्यावर नागरिकांना निसर्गाच्या सान्निध्यात फिरण्याचा आनंद मिळेल अशा पद्धतीने कामे करण्यात यावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.

नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम एकूण ११ भागात विभागण्यात आले असून त्यापैकी संगमवाडी ते बंडगार्डन पूल आणि बंडगार्डन पूल ते मुंढवा या कामासाठी मार्च २०२२ मध्ये आदेश देण्यात आले असून ही कामे सुरू करण्यात आली आहेत. कामाचा प्रथमत: ३०० मीटरचा भाग पूर्ण करण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Pune City Waste Management Vehicles

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘त्या’ तक्रारी सोडविण्यासाठी एकल खिडकी योजना; मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

Next Post

डीएड आणि बीएड अभ्यासक्रमाबाबत झाला हा मोठा निर्णय

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

IMG 20251018 WA0011
महत्त्वाच्या बातम्या

कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी चिंचोंडी औद्योगिक वसाहतीत प्रकल्प…

ऑक्टोबर 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा दिवस… जाणून घ्या, १९ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 18, 2025
IMG 20251018 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकच्या सामन्यात… महाराष्ट्राचा सौराष्ट्र वर १० गडी राखून दणदणीत विजय…

ऑक्टोबर 18, 2025
tejas
महत्त्वाच्या बातम्या

शत्रूला धडकी भरवणारे असे आहे तेजस लढाऊ विमान… मेक इन इंडियाचा बोलबाला…

ऑक्टोबर 17, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर घरबसल्या खरेदी करा सोने आणि मिळवा १० लाखांपर्यंतचे बक्षिस….

ऑक्टोबर 17, 2025
NMC Nashik 1
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरातील २८ ठिकाणची एकत्रित पार्किंग निविदा वादात…

ऑक्टोबर 17, 2025
organ donation
महत्त्वाच्या बातम्या

भावनिक क्षण… आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण…

ऑक्टोबर 17, 2025
IMG 20251017 WA0049
मुख्य बातमी

ओझर येथील कार्यक्रमात ‘तेजस’ लढाऊ विमानासह प्रशिक्षणार्थी विमान राष्ट्राला समर्पित…

ऑक्टोबर 17, 2025
Next Post
College ITI Student

डीएड आणि बीएड अभ्यासक्रमाबाबत झाला हा मोठा निर्णय

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011