पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुळशी ते सातारा मार्गावर शहरात असलेल्या चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा उड्डाणपुल उद्यापासून (१२ ऑगस्ट) खुला करण्याचे नियोजन झाले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुलाचे उदघाटन होणार आहे. या उड्डाणपुलामुळे पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
पुणे- मुंबई- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पुणे शहरातील चांदणी चौक पूल गेल्या वर्षी १ व २ ऑक्टोबर दरम्यानच्या (शनिवार-रविवार) मध्यरात्री नियंत्रित स्फोट करून पाडण्यात आला. चांदणी चौकात होणारी वाहतुकीचा समस्या सोडवण्याच्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने चांदणी चौक येथे एकात्मिक संरचना पूल प्रकल्पाचे काम करण्यात आले आहे. यासाठीच या ठिकाणी अस्तित्वातील जूना पूल पाडण्यात आला. आता हा महामार्ग सहापदरी झाला आहे. याठिकाणचा उड्डाणपूल हा अतिशय रंगबीरंगी केला जात आहे. या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला सध्या रंगकाम सुरू आहे. त्याचा व्हिडिओ केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शेअर केला आहे. बघा, हा व्हिडिओ
भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत एनएचएआयच्या भारतमाला परियोजनेअंतर्गत पुणे शहरातील चांदणी चौक जंक्शनवर एकात्मिक संरचना पूलाचे बांधकाम करण्यात आले आहे. या चांदणी चौक प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. नवीन एनडीए- पाषाण मुख्य पुलाचे (व्हेहीक्युलर ओव्हर पास- व्हीओपी) काम तसेच सुपरस्ट्रक्चरचे काम करण्यात आले आहे.
glimpse of Chandani Chowk Flyover beautification project Pune Video
Pune City Traffic Chandani Chowk Flyover Open
nitin gadkari eknath shinde