पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उन्हाळ्याच्या सुटीत मुलांसोबत पुणे दर्शन करायचे असेल तर तुमच्यासाठी आनंदाची वार्ता आहे. पुणे परिवहन महामंडळाने १ मे पासून विशेष पर्यटन बससेवा सुरू करण्याचे घोषित केले आहे. खासकरुन एसी बसमधून तुम्हाला पर्यटन करता येणार आहे.
१ मे पासून सुरु होणाऱ्या पीएमपीएमएलच्या पिंपरी-चिंचवड दर्शन या वातानुकूलित बस सेवेद्वारे पिंपरी-चिंचवडच्या सौंदर्याचा अनुभव घ्या. आरामात बसा आणि आम्ही तुम्हाला शहरातील ऐतिहासिक व सांस्कृतिक केंद्रांच्या सहलीवर घेऊन जाऊ. आजच आपले तिकीट बुक करा!
पीएमपीएल पुणे शहराच्या आसपासच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी १ मे २०२३ पासून पीएमपीएमएल खास वातानुकूलित पर्यटन बस सेवा सादर करीत आहे. सदर बसेस दर शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी धावतील. ३३ लोकांच्या गटासाठी बुकिंग करा आणि ५ तिकिटांवर १००% सूट मिळवता येणार आहे.
परिवहन महामंडळाचे १) डेक्कन जिमखाना, २) पुणे स्टेशन, ३) स्वारगेट, ४) कात्रज, ५) हडपसर गाडीतळ, ६) भोसरी बसस्थानक, ७) निगडी, ८) मनपा भवन या पास केंद्रावर सदरील बससेवेचे तिकिट बुकींग करण्यात येईल. सदरील बससेवेचे ज्या दिवशी बुकींग केले असेल त्या दिवशी सदर प्रवासास राहत्या घरापासून बस सुटण्याच्या ठिकाणापर्यंत व सायंकाळी पोहचल्यानंतर त्यांना त्यांच्या राहत्या घरापर्यंत सदरील तिकिटावर अन्य मार्गाच्या बसेसमधून प्रवास करण्याची मुभा राहील.
प्रवाशांना मार्गदर्शन करण्याकरिता प्रत्येक बसमध्ये गाईड सेवकाची नेमणूक करण्यात येणार आहे. पीएमपीएमएलने खास तुमच्यासाठी सुरु केलेल्या पर्यटन बस सेवेसह सुट्टीचा आनंद घ्या!, असे आवाहन पीएमपीएलने केले आहे.
सदर सेवेची अधिक माहिती अशी:
१. या दौऱ्याची सुरुवात भक्ती शक्ती बसस्थानक, निगडी येथून होईल.
२. प्रति व्यक्ती तिकीट रु. ५०० आहे.
३. या दौऱ्याची तिकीटे निगडी, भोसरी आणि पिंपरी लोखंडे भवन येथील पास सेंटरवर उपलब्ध आहेत.
४. या दौऱ्याची वेळ सकाळी ०९:०० ते संध्याकाळी ०७:१५ पर्यंत आहे. (2/2)
पुणे शहराच्या आसपासच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी १ मे २०२३ पासून पीएमपीएमएल खास वातानुकूलित पर्यटन बस सेवा सादर करीत आहे.
सदर बसेस दर शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी धावतील. ३३ लोकांच्या गटासाठी बुकिंग करा आणि ५ तिकिटांवर १००% सूट मिळवा. (1/4) pic.twitter.com/7SOwR2mGWh
— Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd (@PMPMLPune) April 29, 2023
Pune City Tourism PMPL AC Bus Service