पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पूर्वी एखादी विकृत घटना पुढे आली की विविध शहरांची नावे डोळ्यापुढे यायची. मात्र आता पुण्याकडे कायम विद्येचे माहेरघर म्हणूनच बघितले जायचे. आता मात्र पुण्यात दररोज कुठली ना कुठली विकृत घटना कानावर येत आहे. अलीकडेच एका बापाने आपल्या पोटच्या लेकीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना पुढे आली आहे.
पुण्यात अत्याचाराच्या घटनेत चांगलीच वाढ झाली आहे. त्यात कुटुंबियांकडूनच अत्याचार झाल्याच्या घटनांचा देखील समावेश आहे. पुण्यात अत्याचाराच्या घटनेत चांगलीच वाढ झाली आहे. त्यात कुटुंबियांकडूनच अत्याचार झाल्याच्या घटनांचा देखील समावेश आहे. वडील आपल्याच मुलीसोबत शाळेत जाताना आश्लील चाळे करत होते. मागील अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. मात्र एक दिवस मुलीने नकार दिला आणि नराधम बापाने रागाच्या भरात मुलीच्या गालाला थेट इस्त्रीचे चटके दिले.
यापूर्वीही मुलीने अनेकदा नकार दिला. प्रत्येकवेळी तिचा बाप तिला शिविगाळ करायचा. कधीकधी मारायचाही प्रयत्न करायचा. मुलीने एकदा वडिलांना ढकलून देण्याचा प्रयत्न देखील केला होता. मात्र या सगळ्याचा प्रतिकार केल्यामुळे नराधम बापाने मुलीला आयुष्यभराची शिक्षा दिली आहे. तिच्या गालाला मोठी जखमदेखील झाली आहे. या प्रकरणात वडिलाविरुद्ध पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अख्ख्या कुटुंबाकडून अत्याचार
काही दिवसांपूर्वी आजोबा, चुलता आणि वडिलांकडून 17 वर्षीय मुलीवर चार वर्ष लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. कॉलेजमधील एका समुपदेशनाच्या तासाच्यावेळी ही घटना समोर आली होती. ही घटना ऐकून समुपदेशकांना धक्का बसला होता. या प्रकरणी बापाला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली होती.
चुलत्यानेही सोडले नाही
मुलीचे आईवडील पुण्यात मोलमजूरी करतात. घरात परिस्थिती नीट नसल्याने लहानपणी तिला उत्तर प्रदेशातील गावाकडे रहायला पाठवले होतं. दोन वर्ष मुलगी उत्तर प्रदेशात रहायला होती. याच दरम्यान चुलत्याने जबरदस्ती करुन तिच्यावर किमान वर्षभर वारंवार लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर तिच्या आजोबांनी देखील तिचे चुंबन घेऊन वारंवार अश्लिल चाळे केले. या संदर्भात तिने अनेकदा विरोध केला होता. मात्र दोघेही वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते.
Pune City Crime Father Sexual Assault Daughter
Molestation abuse Attempt Rape