पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लवकरच जाहीर होण्याची चिन्हे आहेत. भाजप खासदार गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या जागी ही पोटनिवडणूक होणार आहे. मात्र, आता या निवडणुकीवरुन महाविकास आघाडीत सामना रंगल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी म्हटले की, राष्ट्रवादीची पुण्यात ताकद मोठी आहे. त्यामुळे या जागेवर आमचा दावा आहे. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा दावा खोडून काढला. नुकत्याच झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर निवडून आले आहेत. त्यामुळे कुणाची ताकद आहे हे सर्वांना माहित आहे, असे पटोले यांनी म्हटले आहे. या वादात आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे.
खासदार राऊत म्हणाले की, कसेल त्याची जमीन या प्रमाणे..जो जिंकेल त्याची जागा.हे सूत्र ठरले तर “कसबा” प्रमाणे पुणे “लोकसभा” पोट निवडणुक महाविकास आघाडीस सहज जिंकता येईल.जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट अनाठायी आहे.जिंकेल त्याची जागा याच सूत्राने महाराष्ट्र आणि देश जिंकता येईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने थोडा थोडा त्याग करावाच लागेल!
जय महाराष्ट्र!
https://twitter.com/rautsanjay61/status/1663033031471534080?s=20
Pune Bypoll Election Politics Mahavikas Aghadi