पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड या विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणूक होत आहे. या दोन्ही जागांवर भाजपचे आमदार होते. भाजप कुणाला उमेदवारी देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर भाजपने आता उमेदवार जाहीर केले आहेत.
कसबा पेठ मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि पिंपरी चिंचवड चे आमदार लक्ष्मण जगताप यांचे कर्करोगाने निधन झाले आहे. त्यामुळे याठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीमुळे सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
भाजपने आज त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. कसब्यातून हेमंत रासने तर चिंचवडमधून अश्विनी जगताप यांना उमेदवारी करण्यात आली आहे. टिळक कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळणार नसल्याचे भाजप नेत्यांनी यापूर्वीच सांगितले होते. त्यानुसार टिळक कुटुंबातील सदस्य उमेदवार नाही. तर लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबतीलच सदस्याला उमेदवारी देण्यात आली आहे. अश्विनी जगताप या दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आहेत.
https://twitter.com/PrashantBarsin3/status/1621762313304014853?t=J7N4r5yNfUlizEPi9IwSHQ&s=19
महाविकास आघाडीच्या वतीनेया दोन्ही निवडणूक लढवल्या जाणार आहेत. तशी घोषणा काल करण्यात आली आहे.
काँग्रेसकडून कसब्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर चिंचवडमधून राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चिंचवडची जागा शिवसेनेला लढायची होती. पण राष्ट्रवादीने ही जागा सोडण्यास नकार दिल्याने अखेर शिवसेनेने या जागेचा हट्ट सोडला आहे. त्यामुळे कसब्यात काँग्रेस तर पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार जाहीर झाला आहे.