मुंबई – खोटी कागदपत्रे बनवून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्रीकांत आणि शशांक परांजपे बंधूंना मुंबई पोलिसांनी पुण्यातील घरातून मध्यरात्री ताब्यात घेतले आहे. मुंबईतील विलेपार्ले पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही बंधूंना विलेपार्ले पोलिस ठाण्यात आणले आहे.
परांजपे बंधूंसह चार जणांवर विलेपार्ले पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वसुंधरा डोंगरे (वय ७०) नावाच्या महिलेने फसवणुकीची तक्रार दिली होती. मालमत्तेच्या वादातून हा प्रकार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्याविरुद्ध खोटी कागदपत्रे बनवून विश्वासघात आणि फसवणुकीचे कलc लावण्यात आले आहेत. परांजपे बंधूंना ताब्यात घेऊन पोलिस पुढील तपास करत आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!