रविवार, ऑगस्ट 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पुण्यात दहशतवाद्यांकडे सापडल्या अनेक धक्कादायक बाबी… एटीएसचा कसून तपास

by Gautam Sancheti
जुलै 31, 2023 | 1:32 pm
in इतर
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्यात एटीएसच्या हाती लागलेल्या दोन दहशतवाद्यांकडे राज्यातील विविध ठिकाणच्या चित्रीकरणासह पीडीएफ व नकाशांसह एकूण ५०० जीबी डेटा आढळला असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यांच्याकडून ड्रोनही ताब्यात घेण्यात आले आहेत, पण ते कुठे वापरण्यात आले, हे अद्याप कळू शकलेले नाही.

पुण्यातून दोन दहशतवाद्यांना एटीएसने अटक केली. ते तीन साथीदार असून त्यातील एकाचा अद्याप शोध लागलेला नाही. एटीएसने तपास केला असता तिन्ही दहशतवाद्यांनी महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये रेकी करून पुण्यासह इतर ठिकाणचे गुगल स्क्रीन शॉट्स घेऊन ठेवले आहेत. त्यामागचा उद्देश्य अद्याप कळू शकलेला नाही. हाती लागलेले दोन्ही दहशतवादी पूर्णपणे ब्रेनवॉश केलेले आहेत. ते अलसफा नावाच्या दहशतवादी संघटनेशी जुळलेले आहेत. गेल्या तीन ते चार वर्षांपासून ते त्यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्याजवळ जिहादशी संबंधित व्हिडियो, पुस्तके, युट्यूबवरील भाषणे, पीडीएफ कागदपत्रे आदी गोष्टी आढळल्या.

मोहम्मद इम्रान युनूस खान आणि युनूस याकुब साकी हे दोघेही मध्य प्रदेशातील रतलाम येथील मूळ रहिवासी असून त्यांना धर्मांध करण्याचे गेल्या काही वर्षांमध्ये जबरदस्त प्रयत्न करण्यात आले आहेत. त्यांच्याकडे आढळलेल्या लॅपटॉपची क्षमता ५०० जीबी एवढी असून त्यातही अनेक वादग्रस्त व्हिडियो आणि पुस्तकांचे पीडीएफ आहेत. त्यांच्याकडे असलेल्या मोबाईलमध्येही ५०० चित्रपट मावतील एवढा डेटा आढळला आहे.

हॉटेल नव्हे तंबू
सुरुवातीला महाराष्ट्रातील शहरांमध्ये काही ठिकाणी हॉटेल्समध्ये ते ओळख लपवून राहिले. परंतु, त्यानंतर त्यांनी प्लान बदलला आणि प्रत्येक शहरात ते तंबू ठोकूनच राहू लागले. सुनसाण भागामध्ये तंबूमध्ये राहून ते शहरात रेकी करत फिरायचे, अशी माहिती एटीएसच्या हाती लागली आहे.

दोघेही ग्राफिक डिझायनर?
दोन्ही दहशतवाद्यांनी आपली ओळख ग्राफिक डिझायनर म्हणून सर्वांना सांगितली. हीच ओळख सांगून ते पुण्यात राहायचे. पण मुळात तपास केला असताना दोघेही साधे बारावी पासही नव्हते अशी माहिती पुढे आली आहे. पुण्यात एटीएसच्या हाती लागलेल्या दोन दहशतवाद्यांकडे राज्यातील विविध ठिकाणच्या चित्रीकरणासह पीडीएफ व नकाशांसह एकूण ५०० जीबी डेटा आढळला असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यांच्याकडून ड्रोनही ताब्यात घेण्यात आले आहेत, पण ते कुठे वापरण्यात आले, हे अद्याप कळू शकलेले नाही.

पुण्यातून दोन दहशतवाद्यांना एटीएसने अटक केली. ते तीन साथीदार असून त्यातील एकाचा अद्याप शोध लागलेला नाही. एटीएसने तपास केला असता तिन्ही दहशतवाद्यांनी महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये रेकी करून पुण्यासह इतर ठिकाणचे गुगल स्क्रीन शॉट्स घेऊन ठेवले आहेत. त्यामागचा उद्देश्य अद्याप कळू शकलेला नाही. हाती लागलेले दोन्ही दहशतवादी पूर्णपणे ब्रेनवॉश केलेले आहेत. ते अलसफा नावाच्या दहशतवादी संघटनेशी जुळलेले आहेत. गेल्या तीन ते चार वर्षांपासून ते त्यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्याजवळ जिहादशी संबंधित व्हिडियो, पुस्तके, युट्यूबवरील भाषणे, पीडीएफ कागदपत्रे आदी गोष्टी आढळल्या. मोहम्मद इम्रान युनूस खान आणि युनूस याकुब साकी हे दोघेही मध्य प्रदेशातील रतलाम येथील मूळ रहिवासी असून त्यांना धर्मांध करण्याचे गेल्या काही वर्षांमध्ये जबरदस्त प्रयत्न करण्यात आले आहेत. त्यांच्याकडे आढळलेल्या लॅपटॉपची क्षमता ५०० जीबी एवढी असून त्यातही अनेक वादग्रस्त व्हिडियो आणि पुस्तकांचे पीडीएफ आहेत. त्यांच्याकडे असलेल्या मोबाईलमध्येही ५०० चित्रपट मावतील एवढा डेटा आढळला आहे.

हॉटेल नव्हे तंबू

सुरुवातीला महाराष्ट्रातील शहरांमध्ये काही ठिकाणी हॉटेल्समध्ये ते ओळख लपवून राहिले. परंतु, त्यानंतर त्यांनी प्लान बदलला आणि प्रत्येक शहरात ते तंबू ठोकूनच राहू लागले. सुनसाण भागामध्ये तंबूमध्ये राहून ते शहरात रेकी करत फिरायचे, अशी माहिती एटीएसच्या हाती लागली आहे.

दोघेही ग्राफिक डिझायनर?

दोन्ही दहशतवाद्यांनी आपली ओळख ग्राफिक डिझायनर म्हणून सर्वांना सांगितली. हीच ओळख सांगून ते पुण्यात राहायचे. पण मुळात तपास केला असताना दोघेही साधे बारावी पासही नव्हते अशी माहिती पुढे आली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक जिल्ह्यातील धरणांची स्थिती चिंताजनक…. जुलै अखेर अत्यल्प साठा… आता भिस्त ऑगस्टवर

Next Post

आदित्य ठाकरेंनी प्रियंका चतुर्वेदींना सौंदर्य पाहून खासदारकी दिली… संजय शिरसाटांचा आरोप…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
1500x500 e1690793657928

आदित्य ठाकरेंनी प्रियंका चतुर्वेदींना सौंदर्य पाहून खासदारकी दिली... संजय शिरसाटांचा आरोप...

ताज्या बातम्या

Screenshot 20250809 201400 Collage Maker GridArt

दिंडोरी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा बळी…ग्रामस्थांचा दीड तास रास्ता रोको

ऑगस्ट 9, 2025
IMG 20250809 WA0502

सिन्नर बसस्थानकाच्या ताफ्यात ५ नवीन बस दाखल…

ऑगस्ट 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी महत्त्वाची कामे टाळलेली बरी, जाणून घ्या, रविवार, १० ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 9, 2025
Screenshot 20250809 193848 Facebook

उत्तराखंडमध्ये मंत्री गिरीश महाजन यांना महिला पर्यटकांनी बांधली राखी…बघा, नेमकं काय घडलं

ऑगस्ट 9, 2025
Untitled 6

उत्तरकाशीमधून महाराष्ट्रातील ११ पर्यटकांसाठी एअर लिफ्ट…राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

ऑगस्ट 9, 2025
jail11

भाजीपाला व्यावसायीकास मारहाण करीत लुटणा-या तिघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

ऑगस्ट 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011