मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारत निवडणूक आयोगाने 215- कसबा पेठ व 205 – चिंचवड (जि. पुणे) येथील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम 18 जानेवारी, 2023 रोजी प्रसिद्ध केला होता. यासंदर्भात आता सुधारित प्रसिद्धीपत्रक जाहीर केले असून, या निवडणूकीसाठी मतदान, रविवार, दिनांक 26 फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार मंगळवारी, 31 जानेवारी 2023 रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. मंगळवार 7 फेब्रुवारी 2023 उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असेल. प्राप्त उमेदवारी अर्जांची बुधवार 8 फेब्रुवारी 2023 रोजी छाननी होईल. शुक्रवार 10 फेब्रुवारी 2023 उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल. त्यानंतर रविवार, 26 फेब्रुवारी 2023 रोजी मतदान होईल. गुरुवार, 2 मार्च 2023 रोजी मतमोजणी होईल. शनिवारी, 4 मार्च 2023 रोजी निवडणुकिची प्रक्रिया पूर्ण होईल.
Pune Assembly By Poll Election Program Changes