पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : दिशा हॉलिडेज आयोजित व पर्यटन संचालनालय, विभागीय पर्यटन कार्यालय, पुणे यांच्या सहकार्याने “पुणे अष्टगणेश दर्शन महोत्सव” दिमाखदार पद्धतीने पार पडला.
दिशा हॉलिडेज च्यावतीने युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, नॉर्वे, मॅदागास्कर, चिली व मलावी येथील पर्यटकांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. महिला पर्यटकांनी साडी व फेटा तर पुरुषांनी फेटा परिधान करून उत्सवात सहभागी होत पुण्याच्या संस्कृतीत रंगून गेले. त्यांनी गुरुजींसह गणेशाची आरती म्हणत पुण्यातील आठ अष्टगणपती – अखिल मंडई मंडळ, तुळशीबाग, गुरुजी तालीम, तांबडी जोगेश्वरी, केसरीवाडा, कसबा, भाऊसाहेब रंगारी व श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे दर्शन घेतले.गणेश दर्शनानंतर त्यांनी अस्सल श्रेयस हॉटेलची मराठी पुरणपोळी थाळी व उकडीचे मोदक यांचा मनमुराद आस्वाद घेतला. या अविस्मरणीय अनुभवाच्या स्मरणार्थ सर्व पर्यटकांना विशेष स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली.
या सोहळ्यास सहाय्यक संचालक (पर्यटन विभाग) श्रीमती शमा पवार, तसेच अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष मा.श्री अण्णासाहेब थोरात व दिशा टुरिझमचे मालक श्री. तुषार शिंदे व सौ. सुजाता शिंदे, यांसह मधुरा बोडस, स्नेहल हरपळे, विदुला जवंजाल, विक्रम खन्ना, विश्वास भोर, कृष्णा शिंदे, वेदांत चोरघे, वेदांग महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमामुळे पुण्याचा गणेशोत्सव जागतिक पातळीवर पोहोचविणेस निश्चितच हातभार लागला.