पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यात आळंदीमध्ये आज गालबोट लागले. मंदिरातील प्रवेशावरुन वारकरी आणि पोलिस यांच्यात मोठा वाद झाला. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे वारकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तसेच, असा प्रकार आजवरच्या इतिहासात प्रथमच घडला आहे.
इंद्रायणी नदी काठी हजारो वारकरी पालखी सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत. टाळ, मृदूंग आणि हरिनामाच्या गजरात मोठा उत्साह येथे आहे. आळंदीत मंदिर प्रवेशावेळी आज अचानक तणावाचे वातावरण तयार झाले. मंदिर प्रवेशावरुन वारकरी आणि पोलिस यांच्यात मोठा वाद झाला. मर्यादित संख्येने वारकऱ्यांना प्रवेश देण्यावरुन हा वाद होता. वारकऱ्यांनी मंदिरात प्रवेशासाठी मोठी गर्दी केली. मात्र, पोलिसांनी मज्जाव केला. त्यामुळे हा वाद निर्माण जाला. अखेर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला. यामुळे वारकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. दरम्यान, या घटनेनंतर पालखी सोहळ्यात पोलिस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे.
Pune Alandi Palhi Sohala Varkari Police Lathicharge