बुधवार, सप्टेंबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सुसज्ज नाट्यगृह वर्षभर धुळखात पडले… अखेर आज उदघाटन झाले… असे आहे आकुर्डीतील गदिमा नाट्यगृह

by Gautam Sancheti
मे 15, 2023 | 8:23 pm
in इतर
0
Auditorium e1684162392157

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आकुर्डी येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या ग.दि. माडगूळकर नाट्यगृहाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. शहराच्या प्रलंबित प्रश्नांवर बैठक आयोजित करून वेगाने निर्णय घेण्यात येतील आणि जलवाहिन्यांच्या कामासाठी त्वरित भूसंपादनाची कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, मनपा आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते.

पुण्यातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत ग.दि. माडगुळकर नाट्यगृह उभारण्यात आले. या सभागृहाचे काम २०१४ मध्ये सुरू झाले आणि ते २०१७ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. पण नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करतील ते ठेकेदार कसले. कासवगतीने झालेले काम पूर्ण व्हायला आठ वर्षे लागली. आणि गेल्यावर्षी जूनमध्ये नाट्यगृह बांधून पूर्ण झाले. पण आता त्याच्या उद्घाटनासाठी गेल्या दहा महिन्यांपासून नेत्यांच्या तारखा मिळत नाहीत. त्यामुळे कलावंतांसह सर्वसामान्यांनी नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे.

वर्षभरात दोनवेळा निवडणुकीच्या प्रचारांसाठी भाजप नेत्यांच्या मोठ्या सभा झाल्या. पण साध्या उद्घाटनासाठी त्यांना वेळ मिळत नाही, हे दुर्दैव आहे, अशी भावना व्यक्त होत आहे. शहरातील महापालिकेच्या इतर नाट्यगृहांपेक्षा गदिमा नाट्यगृह वेगळे आहे. यामध्ये एक मिनी थिएटर, ॲम्फी थिएटर, प्रशस्त सभागृह, कलादालन आणि मल्टिप्लेक्ससारखे थिएटर आहे.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, शहर वेगाने वाढतांना पाणी पुरवठा, सांडपाण्याचा निचरा आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट महत्वाची आहे. शहराचे सौंदर्य शाश्वत विकासात आहे असा नवा विचार अलिकडच्या काळात समोर आला आहे. नव्या १०० द.ल.लिटर जलशुद्धीकरण प्रकल्पामुळे शहराला चांगला पाणी पुरवठा होईल. जलशुद्धीकरण केंद्राने ३०० द.ल.लिटरची क्षमता गाठल्यावर शहराची गरज पूर्ण होईल. वाढत्या लोकसंख्येला पाणी देण्यासाठी पुढील टप्पा महत्वाचा आहे. जलवाहिन्यांसाठी आवश्यक भूसंपादनासाठी अडचण दूर करून आवश्यक जमीन एका महिन्याच्या आत महापालिकेला देण्यात यावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिली. महापालिकेने पाणी पुरवठ्याची कामे वेगाने करून पुढील दोन वर्षात मुबलक पिण्याचे पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करावे, असे श्री.फडणवीस म्हणाले.

सांडपाण्यावर प्रक्रिया करा
पिण्याच्या पाण्याचा विचार करताना सांडपाण्यावर प्रक्रीया करून त्याचा पुनर्वापर करण्याची गरज आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या परिसरात औद्योगिक क्षेत्र असल्याने या क्षेत्रासाठी अशा पाण्याचा उपयोग करता येईल. वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर केल्यास शहराच्या परिसरातील गावांनाही पाणी मिळून त्यातील वाद टाळता येतील, सेाबतच नद्यांचे प्रदूषण थांबविता येईल. शाश्वत शहरांकडे जाण्यासाठी हे पाऊल महत्वाचे ठरेल. प्रत्येक शहराला वर्षानुवर्षे साठवलेले कचऱ्याच्या डोंगरांवर प्रक्रीया करणेदेखील आवश्यक आहे. या गोष्टी वेगाने केल्यास पिंपरी चिंचवड आधुनिक शहर म्हणून ओळखले जाईल.

भविष्यातील शहरांमध्ये पिंपरी चिंचवड
भविष्यातील शहरांमध्ये पिंपरी चिंचवड शहराचा समावेश आहे. त्यामुळे या शहराकडून मोठ्या अपेक्षा आहे. शहराचे संचलन करणारी इमारत सुंदर असली पाहिजे. अशी प्रशासकीय इमारत लवकरच उभी राहणार आहे. इमारतीसोबत काम करणारी माणसे संवेदनशील असणे महत्वाचे असते. चांगली कार्यसंस्कृती निर्माण करणारे वातावरण नव्या इमारतीत असेल. सामान्य माणसाची कामे वेगाने होतील अशी आधुनिक सुविधांनी युक्त इमारत तयार होत आहे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. पोलीस आयुक्तालयासाठी नवीन इमारत आणि मनुष्यबळ देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

नाट्यगृहाला गदिमांचे नाव देऊन शहराची उंची वाढली
गदिमांच्या नावाने अतिशय सुंदर सभागृह तयार केल्याबद्दल महापालिकेचे अभिनंदन करून श्री.फडणवीस म्हणाले, साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रातले ग.दि. माडगुळकरांचे नाव अमर आहे. महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात आणि मराठी माणसासाठी गदिमा हे अविस्मरणीय स्वप्न आहे. त्यांना आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जाते. गीत रामायणाच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाची कथा त्यांनी अजरामर केली. पिढ्या बदलल्या तरी त्यातला गोडवा वाढत राहिला. साहित्याच्या क्षेत्रात त्यांचे प्रचंड योगदान आहे. हिंदी चित्रपटातही त्यांचे योगदान महत्वाचे आहे. अशा व्यक्तीचे नाव एखाद्या सभागृहाला देऊन त्या शहराची उंची वाढते, ते काम आपण केले आहे.

कामे गतीने पूर्ण केल्याबद्दल महापालिका प्रशासनाचे अभिनंदन करून पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरात वाढत्या उद्योगधंद्यासोबत लोकसंख्याही वाढत आहे. वाढत्या लोकसंख्याच्या गरजा विचारात घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. प्रशासनाच्यावतीने शहरात कचरा प्रकल्प, रस्ते, सुरक्षा, स्वच्छता आदी विषयावर प्रशासन काम करीत असून ते पूर्ण करण्यासाठी प्रशासनाच्या गतीमानतेसोबत नागरिकांचे सहकार्यही आवश्यक आहे. शहरातील प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

खासदार बारणे म्हणाले, शहराची गरज ओळखून जलशुद्धीकरण केंद्र आणि तारांगणाचे काम झाले याचे समाधान आहे. नागरिकांच्या गरजेचे प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन होत आहे. चांगले प्रकल्प उपयुक्त ठरावेत यासाठी नागरिकांनी देखील त्याकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.

आमदार लांडगे म्हणाले, पुढील ३० वर्षाचा विचार करून शहरातील विकासकामे करण्यात येत आहेत. येत्या काळात कचऱ्याचे डोंगर सपाट करण्यात येतील. मोशी येथे २०० खाटांचे कर्करोगाचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. टेनिस सोबत कुस्तीमध्येही शहरातील खेळाडू ऑलिम्पिकला जावा असे प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

आयुक्त शेखर सिंह यांनी प्रास्ताविकात महानगरपालिकेतर्फे करण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. ते म्हणाले, महापालिकेसाठी ३१२ कोटींची नवीन प्रशासकीय इमारत उभी राहणार आहे. ही ग्रीन इमारत असणार आहे. शहराची ओळख सांस्कृतिक नगरी व्हावी यासाठी ग.दि.माडगूळकर सभागृह ६७ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आले आहे. शैक्षणिक क्षेत्रातही महापालिकेने गुणवत्ता वाढीसाठी चांगले प्रयत्न केले आहे. शहरात आरोग्य सुविधेसाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाला सुरू करण्यात आला आहे. शहराला देशातील स्वच्छ आणि सुंदर शहर करण्याचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते ग.दि.माडगूळकर यांच्या चौथ्या पिढीतील कुटुंब सदस्यांचा सत्कार करण्यात आला आणि गदिमा यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला माजी खासदार अमर साबळे, माजी महापौर माई ढोरे, पीएमआरडीए आयुक्त राजीव महिवाल, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, सुमीत्र माडगूळकर आणि माडगूळकर कुटुंबिय आदी उपस्थित होते.

अकरा विविध विकासकामांचे उद्घाटन
यावेळी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. यात निघोजे एमआडीसी तळवडे येथील इंद्रायणी नदीवरील पंप हाऊस व इतर प्रकल्प, बोऱ्हाडेवाडी व नेहरूनगर येथील शाळा इमारत, मोशी येथील उप अग्निशमन केंद्र (सब फायर स्टेशन), रावेत येथील सेक्टर ३२ए मधील उद्यान, मध्यवर्ती निर्जंतूकीकरण पुरवठा विभाग, चिंचवड येथील क्षेत्रीय कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत, इंद्रायणीनगर येथील उद्यान व विरंगुळा केंद्र, चिखली येथील भाजी मंडई, निगडी येथील लाईट हाऊस प्रकल्प, स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल व वीर सावरकर उद्यानातील लॉन टेनिस कोर्टचे उद्घाटन यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आले.

विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उपक्रमांचा शुभारंभ
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भामा आसखेड प्रकल्पातील जॅकवेलचे काम, डेअरी फार्म येथील पूलाचे काम, मोशी, डुडूळगाव येथील प्राथमिक शाळेची इमारत, चोविसावाडी येथील नवीन अग्निशमन केंद्र उभारणे, गवळीमाथा व कासारवाडी येथील घरगुती घातक कचरा प्रक्रीया केंद्र, पॅकेज ३ अंतर्गत भोसरी विभागातील धावडे वस्ती येथील पाण्याची टाकी बांधण्याच्या कामांचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले. मनपा हद्दीतील सर्वंकष मालमत्ता सर्वेक्षण, मालमत्तांची सुधारीत कर आकारणी, मालमत्ता कर विभागाच्या सर्व सेवा वार्षिक पातळीवर पुरविणे आणि दिव्यांगांकरिता निरामय आरोग्य विमा योजनेचा शुभारंभही यावेळी करण्यात आला.

चिखली येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन
तत्पूर्वी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते चिखली येथील १०० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. पिंपरी चिंचवड शहराच्या लोकसंख्या वाढीचा दर, विकासाचा वेग आणि २०३१ पर्यंतची लोकसंख्या लक्षात घेऊन चिखली येथे ३०० द.ल. लिटर प्रतिदिन क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याचे नियोजित असून त्यातील पहिल्या टप्प्यात १०० द.ल. लिटरचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

https://twitter.com/Info_Pune/status/1658078631279874049?s=20

Pune Akurdi GDM Auditorium Open for Public

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर होणार आता ही कठोर कारवाई; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Next Post

डान्सर गौतमी पाटील विरुद्ध गुन्हा दाखल; हे आहे प्रकरण

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

IMG 20250901 WA0417
महत्त्वाच्या बातम्या

ओबीसीतून आरक्षण देण्यास आमचा विरोध, आजपासून राज्यभर उपोषणे आणि आंदोलने

सप्टेंबर 2, 2025
Screenshot 20250830 073400 Chrome
संमिश्र वार्ता

गणेशोत्सवानिमित्त राज्याबाहेर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

सप्टेंबर 2, 2025
fire 1
क्राईम डायरी

धक्कादायक….कौटूंबिक वादातून मुलाने आईवर ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिले

सप्टेंबर 2, 2025
image002EJ0W
महत्त्वाच्या बातम्या

रेल्वे आणि स्टेट बँक यांच्यात रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी झाला हा मोठा करार….

सप्टेंबर 2, 2025
crime1
क्राईम डायरी

चर्चच्या फादरसह अन्य दोघांवर टोळक्याचा हल्ला…जत्रा हॉटेल भागातील घटना

सप्टेंबर 2, 2025
Screenshot 20250831 144755 Facebook
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा पाच दिवस…कोर्टाच्या आदेशानंतर ही आहे स्थिती

सप्टेंबर 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना काही आर्थिक समस्या त्रासदायक ठरतील, जाणून घ्या, मंगळवार, २ ऑगस्टचे राशिभविष्य

सप्टेंबर 2, 2025
ed
संमिश्र वार्ता

ईडीने बाईकबॉट घोटाळ्याप्रकरणी ३९४.४२ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता केली जप्त

सप्टेंबर 1, 2025
Next Post
Gautami Patil

डान्सर गौतमी पाटील विरुद्ध गुन्हा दाखल; हे आहे प्रकरण

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011