पुणे – पुणे विमानतळावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पुणे विमानतळावरील रनवेच्या दुरुस्तीमुळे पुणे विमानतळ तब्बल १४ दिवस बंद रहाणार आहे. विमानतळाचा सांभाळ करणाऱ्या एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने अधिकृत ट्विटर खात्यावरून ही माहिती दिली आहे. येत्या १६ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबरपर्यंत विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द राहणार आहेत. पुणे विमानतळाचा रनवे हा हवाई दलाच्या मालकीचा आहे. या रनवेच्या पुनरुत्थानाचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे या १४ दिवसांच्या काळात येणारी आणि जाणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
https://twitter.com/aaipunairport/status/1445372355149131786