पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शनिवारी सायंकाळी शहरातील सदाशिव पेठ परिसरात भावे हायस्कूल जवळ चहा प्यायला आलेल्या एमपीएससीच्या १२ विद्यार्थ्यांना दारु पिऊन कार चालवणा-या ड्रायव्हरने उडवल्याची घटना घडली. हे सर्व विद्यार्थी कारच्या धडकेने जखमी झाले असून त्यांच्यावर संचेती व मोडक हॅास्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. दरम्यान कार चालक जयराम मुळे (२७) बिबवेवाडी व वाहनाचा मालक दिंगबर यादव, सहप्रवासी राहुल गोसावी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भावे हायस्कूलच्या परिसरात अरुंद रस्ते आणि छोटी गल्ली असून कार चालक भरधाव वेगाने आला. त्यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे समोर चहा पित असलेल्या विद्यार्थ्यांना त्याने उडवलं. जखमीमध्ये तीन मुलीही सुध्दा आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
या सर्व विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करण्यात यावे असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. यांचा जो काही खर्च असेल तो शासन करणार आहे. यातील काही विद्यार्थ्यांचा आज एपीएससीचा पेपर आहे.