इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुण्यातील पौड फाट्याजवळ काल रात्री पौडफाट्याजवळ रात्री ११ च्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या ड्रायव्हरने पीक अप गाडीने पाच वाहनांना धडक दिल्याची घटना घडली. या अपघातामध्ये अनेक गाड्यांचे नुकसान झाले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी श्रीकांत अमराळे हे गंभीर जखमी झाले. तर त्यांच्या पत्नी गीतांजली अमराळे यांचा मृत्यू झाला आहे. या अपघात प्रकरणात ड्रायव्हर आशिष पवार याला अलंकार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पीक अप ड्रायव्हर दारूच्या नशेत होता. त्याने अनेक गाड्यांना धडक देत दिली. त्यानंतर सिग्नलजवळ मनसेचे पदाधिकारी श्रीकांत अमराळे व त्यांची पत्नी गीतांजली हे उभे होते. त्यावेळेस हा पीक अप गीतांजली अमराळे यांच्या अंगावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर श्रीकांत अमराळे हे गंभीररित्या जखमी झाले, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची ही घटना गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाहिला आणि त्यांनी धाव घेत टेम्पो थांबवून आरोपी ड्रायव्हर आशिष याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
पुण्यातील करिश्मा चौकात या ड्रायव्हरने अनेक गाड्यांना धडक दिली. तेथेही काही जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा चालक दारूच्या नशेत पीकअप चालवत पुढे गेला आणि अनेक गाड्यांना धडक देत होता. त्यानंतरही त्याने गाडी थांबवलीच नाही तर पुढेच नेल्यामुळे गाड्यांचे नुकसान झाले तर एका महिलेचा मृत्यू झाला.