पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पुणे दौऱ्यावर असतांना ते दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात गेले. यावेळी त्यांनी गणपती बाप्पाचं बाहेरुन मुख दर्शन घेतले. मंदिराच्या उंबऱ्याबाहेरच ते उभे राहिले. मंदिर विश्वस्तांनी दारातच हार, तुरे आणि प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला. त्यानंतर त्यांनी बाप्पासमोर हात जोडले. पण, ते मंदिरात गेले नाही. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. पण, त्यानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माहिती देतांना सांगितले की, नॉनवेज खाल्ले असल्याने मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी न जाता त्यांनी बाहेरुन दर्शन घेतले.