मुंबई – पुलवामामध्ये २०१९ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार सध्या जिवंत असून, तो काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांना प्रोत्साहन देत असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. समीर मोहम्मद डार असे या दहशतवाद्याचे नाव आहे. ३१ जुलै रोजी झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचा कमांडर मोहम्मद इस्माइल अल्वी ऊर्फ लंबू याच्यासोबत समीर डार मारला गेल्याचे मानले जात होते.
भारतीय सुरक्षा संस्थेचे अधिकारी सांगतात, जुलैमध्ये झालेल्या ऑपरेशनमध्ये लंबू (जैशचा प्रमुख मौलाना मसूद अझहरचा नातेवाईक) याच्यासोबत मारला गेलेला दुसरा दहशतवादी समीर अहमद डार नव्हे, तर एक पाकिस्तानी नागरिक होता. त्याची ओळख पटवणे बाकी आहे. पुलवामाच्या नागबेरन-तरसर वन क्षेत्रात मेजर जनरल रशीम बाली यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऑपरेशनमध्ये दहशतवादी लंबू मारला गेला होता. त्यादरम्यान समीरही मारला गेल्याचे सांगण्यात आले होते. परंतु नवीन सूचनेच्या आधारावर अहमद डार अजूनही जिवंत असून, काश्मीर खोर्यात प्रोत्साहन देत आहे.
सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेलेला दहशतवादी लंबू हा पाकिस्तानमधील बहावलपूरमधील राहणारा होता. १४ फेब्रुवारी २०१९ च्या पुलवामा हल्ल्यातील मुख्य आरोपींपैकी एक होता. बहालपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर मोठ्या सुरक्षेत राहात आहे. तेथूनच तो दहशतवादी कारवायांचे संचलन करतो. एनकाउंटरदरम्यान मारला गेलेला दहशतवादी पुलवामाचा एक स्थानिक दहशतवादी २२ वर्षीय समीर डार असल्याचे सांगण्यात आले होते. २०१८ पासून समीर डार जैशमध्ये सहभागी झाला होता. सुरक्षा यंत्रणांनी नंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांना दाखविले, तेव्हा दुसरा दहशतवादी डार नव्हता. मृतदेहाची जवळून तपासणी केली असता त्याचे छायाचित्रे शरीराशी मिळतेजुळते नव्हते.