चेन्नई – पुदुच्चेरीचे नवे मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना चेन्नईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. एन . रंगास्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ४८ तासानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. पुदुच्चेरीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला कौल मिळाल्यानंतर एन. रंगास्वामी यांची मुख्यमंत्रीपदावर वर्णी लागली होती.