नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्येष्ठ साहित्यिक तु.सी.ढिकले यांच्या पुण्याच्या वैशाली प्रकाशन प्रकाशित ‘लेणे सृजनाचे’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन रविवारी ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. नाशिक येथील सावानाच्या ग्रंथालयभूषण मु.शं.औरंगाबादकर सभागृहात आमदार राहुल ढिकले, मविप्र अध्यक्ष डॉ.सुनील ढिकले, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, ज्येष्ठ साहित्यिक नरेश महाजन, विवेक उगलमुगले, ज्येष्ठ समीक्षक प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन होणार आहे. यावेळी प्रकाशक विलास पोतदार, सिद्धपिंपरीचे माजी पोलीस पाटील जगन्नाथ पाटील, आदिवासी सेवा समितीचे सेवानिवृत्त प्राचार्य निवृत्ती सावदेकर, सुभाष भावसार, योगाचार्य अशोक पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कवी रवींद्र मालुंजकर हे सूत्रसंचालन करणार आहेत. या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन वैशाली प्रकाशनासह यशवंत ढिकले, तुकाराम ढिकले, नारायण ढिकले, गोरक्ष ढिकले, सचिन ढिकले, डॉ.प्रसाद ढिकले यांनी केले आहे.