इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, होळी-दिवाळी आणि इतर सर्व सार्वजनिक सुट्ट्या, साजरे करायला कोणाला आवडत नाही! अनेकदा नोकरदार लोक त्यांना त्यांचा हक्क समजतात. तथापि, असे काही व्यवसाय आहेत जेथे सार्वजनिक सुट्ट्या असे काही नसते. आतापर्यंत या यादीत हिंदी चित्रपटांचाही समावेश होता. होय, सिनेमा हे एक जग आहे जिथे सुट्टीचा दिवस निश्चित नाही. चित्रपटाचे चित्रीकरण दररोज केले जाते. दररोज स्क्रिप्ट्स लिहिल्या जातात, चित्रपटांवर काम चालू असते. मात्र, आता हिंदी चित्रपटसृष्टीतही सार्वजनिक सुट्टी साजरी होणार! हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.
फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने 2023 सालासाठी सक्तीच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. वर्षभरात एकूण 12 सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. दर महिन्याला स्टार्सना सार्वजनिक सुट्टी मिळणार आहे. यामध्ये जानेवारी महिन्यात प्रजासत्ताक दिनाची (२६ जानेवारी) सुट्टी असेल. त्याचबरोबर 18 फेब्रुवारीला महाशिवरात्रीनिमित्त सुट्टी देण्यात येणार आहे. मार्च महिन्यात होळीची सुट्टी (८ मार्च) असेल. 22 एप्रिल रोजी रमजान ईदची सुट्टी असेल. 1 मे रोजी कामगार दिनाची सुट्टी, 29 जून रोजी ईदची सुट्टी आणि 29 जुलै रोजी मोहरमची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य दिनाची (15 ऑगस्ट) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आणि सप्टेंबरमध्ये स्टार्सना गणेश चतुर्थीची सुट्टी मिळणार आहे. ऑक्टोबरमध्ये दसरा, नोव्हेंबरमध्ये एक दिवस दिवाळीची सुट्टी आणि डिसेंबरच्या शेवटच्या महिन्यात ख्रिसमसची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच सार्वजनिक सुटी जाहीर करणे कौतुकास्पद आहे. केवळ चित्रपट कलाकारांनाच नाही तर चित्रपटसृष्टीत काम करणा-या सर्व कामगारांनाही याचा लाभ मिळणार आहे. यावर चित्रपट क्षेत्रातील कलाकार काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.
Public Holidays Declared in Bollywood Film Industry First Time
Entertainment Movie