लखनऊ – सोशल मीडिया अर्थात समाज माध्यम यांच्या मदतीने विधायक कार्य होत असले तरी काही वेळा याद्वारे समाज विघातक काम देखील करण्यास काही लोक मागे पुढे पाहत नाही. फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाल्यावर अनेक जण लग्न करतात, मात्र ही अशा प्रकारची लग्न फार दिवस टिकत नाही, कारण बऱ्याच वेळा त्यात फसवणूक झालेली असते.
अलिगड शहरातील एका पोलीस ठाण्यात तैनात पोलीस उपनिरीक्षकाची तीन वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून मेरठमध्ये राहणाऱ्या एका तरूणीशी मैत्री झाली. त्यानंतर दोघांची जवळीक वाढली आणि प्रेमसंबंध निर्माण झाले. लग्नाच्या बहाण्याने या इन्स्पेक्टरने शारीरिक संबंध ठेवले, पुढे तीन महिन्यांनी त्या दोघांचे लग्न झाले. त्यानंतर दोघे एकत्र राहू लागले.
या दरम्यान मुलीने मुलीला जन्म दिला, मात्र मुलगी झाल्यावर इन्स्पेक्टरने तिला त्रास देणे सुरू केले. एवढेच नाही तर तिला मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. इतकेच नव्हे तर आता इन्स्पेक्टर पुन्हा दुसरे लग्न करण्याची धमकी देत आहे. तेव्हापासून ती तरूणी तिच्या माहेरी राहत आहे. आता पीडित तरूणीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे न्यायासाठी अपील केले आहे. सदर प्रकरण तातडीने कार्यवाही करत आता दोन्ही बाजुच्या लोकांना बोलावले असून लवकरच पुढील योग्य कारवाई केली जाणार आहे.