मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्पर्धा परिक्षेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार नेहमी आवाज उठवत असतात. त्यांनी यावेळेस PSI च्या २००० हून अधिक जागा रिक्त असल्याचे सांगत ही भर्ती का होत नाही याचे कारणही सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये सांगितले आहे.
या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी सांगितले की, गृहविभागाने PSI पदांचे मागणीपत्रक न पाठवल्याने combine परीक्षेची जाहिरात अडकून पडली आहे. आयोग सकरात्मक असताना, PSI च्या २००० हून अधिक जागा रिक्त असताना serious पणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना गृहविभागाकडून आडकाठी का आणली जात आहे ? गृह_विभागाने थोडी कार्यतत्परता दाखवली तर लाखो विद्यार्थ्यांचा स्वप्नांचा मार्ग मोकळा होणार आहे, त्यामुळे विद्यार्थी हित लक्षात घेत गृहविभागाने आयोगाला रिक्त जागांचे मागणीपत्रक त्वरित पाठवावे व combine परीक्षेचा मार्ग खुला करावा. अन्यथा पुन्हा एकदा…आणि ते आता सरकारला परवडणार नाही.
या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे.