शनिवार, सप्टेंबर 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कालाय तस्मै नमः! ब्रिटनच्या या टॉप १० ब्रँडचे मालक आहेत भारतीय; बघा, कोणते आहेत ते?

by Gautam Sancheti
ऑगस्ट 28, 2022 | 5:06 am
in राष्ट्रीय
0
sucess

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त भारत आणि भारतीयांच्या अनेक यशस्वी कथा समोर येत आहेत. इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन भारताला ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. या ७५ वर्षात भारताने आणि भारतीय नागरिकांनी अतिशय वाखाणण्याजोगे यश मिळविले आहे. त्याची दखल जगभरात घेतली जात आहे. आज आपण अशाच एका अनोख्या यशाची महती जाणून घेणार आहोत. सन १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. पण त्यानंतरही काही वर्ष व्यापार विश्वात ब्रिटनच्याच कंपन्यांचा दबदबा होता. त्यावेळी टाटा, बिरला, गोदरेज यांसारखे भारतीय उद्योगपती आपापल्या क्षेत्रात चांगलं काम करत होतेच. पण ब्रिटिश ब्रँडची त्यावेळी चांगली चलती होती. हळूहळू भारतीय ब्रँड आणि व्यापाऱ्यांनी विस्तार केला. आज अशी स्थिती आहे की ब्रिटनमधल्या अनेक नावाजलेल्या ब्रँडची मालकी भारतीय व्यक्तींकडे आहे.

 रॉयल एन्फिल्ड :
एकेकाळी ब्रिटनचं जणू प्रतिक मानलं जाणाऱ्या कंपन्यांची मालकी आता भारतीय उद्योजकांकडे आली आहे. रॉयल एन्फिल्ड एक ब्रिटिश मोटारसायकलचा आयकॉनिक ब्रँड होता. ब्रिटनमधील Redditch मध्ये The Enfield Cycle Company Ltd रॉयल एन्फिल्ड ब्रँडच्या नावानं १९०१ साली कंपनी स्थापन झाली होती. भारताच्या स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्ष हा ब्रँड ब्रिटिशच राहिला होता. १९९४ साली वाहन निर्माती कंपनी आयशर मोटर्सनं एन्फिल्ड कंपनीची खरेदी केली. आज क्लासिक बाइक सेगमेंटमध्ये रॉयल एन्फिल्डचा दबदबा आहे.

जॅग्वार लँड रोव्हर :
एक लग्झरी कार कंपनी एकेकाळी ब्रिटिशच्या अभिमानाचं प्रतिक समजली जात होती. त्यानंतर अमेरिकन कंपनी फोर्ड मोटर्सनं याची खरेदी केली. फोर्ड मोटर्सच्या बऱ्याच प्रयत्नांनंतरही जॅग्वारच्या खरेदीत काही सुधारणा होऊ शकली नाही. फोर्डनं अखेरीस २००८ साली कंपनी विक्रीचा निर्णय घेतला. लागलीच भारतीय कंपनी टाटा मोटर्सनं यात रस दाखवला आणि जॅग्वार लँड रोव्हरची मालकी टाटांकडे आली. त्यानंतर जॅग्वार लँड रोव्हरचं नशीब पालटलं. टाटानं डिझाइन आणि अत्याधुनिकतेवर काम केलं. आता लँड रोव्हर फक्त भारत किंवा ब्रिटनमध्येच नाही, तर जगभर एक अव्वल लग्झरी कार ब्रँड म्हणून ओळखला जातो.

Tetley Tea:
भारतात चहाविना सकाळ होत नाही असं म्हणतात. भारतात चहा इंग्रज घेऊन आले आणि यातून त्यांनी प्रचंड पैसा कमावला. Tetley Tea जगातील सर्वाधिक चहा विक्री करणारा ब्रँड म्हणून ओळखला जातो. आजही हा ब्रँड टाटा उद्योग समूहाचा भाग आहे. जवळपास २०० वर्ष जुनी ही कंपनी टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेनं विकत घेतली. तेव्हापासून हा ब्रिटिश बँड भारतीय कंपनीचा हिस्सेदार आहे. ब्रिटनसह कॅनडातही हा सर्वाधिक चहा विक्री करणारा ब्रँड आहे.

इस्ट इंडिया :
या कंपनीचं नाव माहित नसेल असं क्वचितच कुणी असावं. १८५७ पर्यंत याच कंपनीचा भारतीय बाजारपेठेवर कब्जा होता. एकेकाळी इस्ट इंडिया कंपनी कृषीपासून खाणकाम आणि रेल्वेपर्यंत सर्वच कामं पाहात होती. भारतीय वंशाचे व्यापारी संजीव मेहता यांनी ही कंपनी विकत घेतल्यानंतर तिला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचं स्वरुप दिलं. आजही ही कंपनी चहा, कॉफी, चॉकलेट इत्यादी वस्तूंची ऑनलाइन विक्री करते.

Hamleys:
गुणवत्तापूर्ण खेळणी बनवण्यात Hamleys चा हात कुणीही धरू शकत नाही. भारतासह अमेरिका, ब्रिटन, चीनसारख्या मोठ्या देशांमध्ये या ब्रँडची खेळणी विकली जातात. भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीनं २०१९ साली Hamleys कंपनीची खरेदी केली. सध्या जगभरात या ब्रँडचे २०० हून अधिक आउटलेट्स आहेत. अनेक देशांमध्ये ही कंपनी सर्वात मोठी किड्स टॉय बनवणारी कंपनी आहे. जागतिक पातळीवर नंबर वन बनवण्याच्या ध्येयासह रिलायन्स समूह सध्या काम करत आहे.

Diligenta :
टाटांनी अनेक परदेशी कंपन्या आणि खासकरुन ब्रिटिश कंपन्यांची खरेदी केली आहे. ब्रिटिश आयटी कंपनी Diligenta देखील याचाच एक भाग आहे. टाटा समूहातील टीसीएस कंपनीनं Diligenta कंपनीची खरेदी केली. टीसीएस देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी म्हणून ओळखली जाते.

Corus Group:
टाटांनी विकत घेतलेल्या ब्रँड्सपैकी कोरस ग्रूप हे देखील अत्यंत महत्वाचं नाव आहे. Corus Group न जगभरात भले स्टील मार्केटमध्ये ब्रिटनचं नावलौकिक केलेलं असलं तरी टाटा समूहाच्या टाटा स्टील लिमिटेड कंपनीनं २००७ साली Corus Group कंपनीला खरेदी केलं. आता ब्रिटनमध्ये हिच कंपनी Tata Steel Europe नावानं ओळखली जाते. ही कंपनी खरेदी करताच टाटांची युरोपातील स्टील बाजारपेठेत एन्ट्री झाली होती

Optare
हा ब्रिटिश ब्रँड देखील आज भारतीय ऑटो कंपनी Ashok Leyland कंपनीचा हिस्सा आहे. ही कंपनी सिंगल डेकर, डबल डेकर, टूरिस्ट, लग्झरी आणि इलेक्ट्रिक बस तयार करण्याचं काम करते. युरोपातील सर्वाधिक विक्री होणारा हा ब्रँड आहे. इलेक्ट्रिक बस बनवण्यातही ही कंपनी अव्वल स्थानीआहे.

BSA Motorcycles :
सध्याची उपलब्ध संसाधन पाहाता महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी मोठ्या तयारीत आहे. महिंद्रा समूहानं क्लासिक लिजेंडच्या माध्यमातून याची सुरुवात २०१६ साली BSA Motorcycles कंपनी खरेदी करुन केली. हा ब्रँड देखील एकेकाळी ब्रिटनचे टॉप व्यापारी असलेल्या Birmingham Small Arms Company कडे होता. क्लासिक लीजेंडनं याचं अधिग्रहण केलं होतं. नुकतंच BSA Goldstar 650 लॉन्चच्या माध्यमातून या ब्रँडचं कमबॅक झालं आहे.

Imperial Energy:
ब्रिटनच्या या पेट्रोलियम आणि गॅस कंपनीला भारताच्या सरकारी कंपनी असलेल्या ओएनजीसीनं खरेदी केलं आहे. ही कंपनी रशिया, ब्रिटन आणि इतर युरोपीय देशांमध्ये काम करते. सायबेरियातील सर्वात मोठी क्रूड ऑइल कंपनी म्हणून ती ओळखली जाते. या कंपनीच्या माध्यमातून सायबेरियातून जगातील अनेक देशांना तेल आणि गॅसची निर्यात होते.

Proud Britain Top 10 Brands Owner are Indians
Jaguar Royal Enfield

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भंगार नाही सोनेच! रेल्वेला भंगारातून मिळाली चक्क एवढी रक्कम

Next Post

जबरदस्त बातमी! कर्मचाऱ्यांनो, टेन्शन घेऊ नका! पगारात होणार एवढी घसघशीत वाढ

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता, जाणून घ्या, रविवार, २१ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 20, 2025
cricket
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये नोव्हेंबर मध्ये दोन रणजी सामन्यांचा थरार….हे सामनेही होणार

सप्टेंबर 20, 2025
crime1
क्राईम डायरी

अनैतिक संबधाच्या संशयातून परप्रांतीय तरुणाचे अपहरण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

सप्टेंबर 20, 2025
rajanatsing
राष्ट्रीय

संरक्षण मंत्री या तारखे दरम्यान मोरोक्कोला देणार भेट…दोन दिवसाचा दौरा

सप्टेंबर 20, 2025
rape
क्राईम डायरी

चार महिन्यापासून महिलेच्या मोबाईलवर अश्लिल फोटो, व्हिडीओ व संदेश पाठवले…गुन्हा दाखल

सप्टेंबर 20, 2025
fir111
क्राईम डायरी

नाशिकमध्ये दिग्दर्शक असलेल्या तरुणाची साडेपाच लाख रूपयांची अशी केली फसवणूक

सप्टेंबर 20, 2025
Screenshot 20250920 151721 WhatsApp 1
स्थानिक बातम्या

त्र्यंबकेश्वरमध्ये गावगुंडाकडून पत्रकारांना बेदम मारहाण…काठी व दगडाचा वापर

सप्टेंबर 20, 2025
cbi
संमिश्र वार्ता

CBI ने या स्पर्धा परिक्षा घोटाळ्यातील भरती प्रकरणी पाच आरोपींना केली अटक…IAS सह उच्च अधिकारी जाळ्यात

सप्टेंबर 20, 2025
Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

जबरदस्त बातमी! कर्मचाऱ्यांनो, टेन्शन घेऊ नका! पगारात होणार एवढी घसघशीत वाढ

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011