मुंबई – राज्यातील अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या प्राध्यापक आणि प्राचार्य पदांच्या भरतीबाबत गुडन्यूज आहे. यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, राज्यातील प्राध्यापक व प्राचार्य पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. प्राध्यापकांची तब्बल २०८८ तर प्राचार्यांची ३७० पदे भरण्यात येणार आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय हा लवकरच काढण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्राध्यापक किंवा प्राचार्य पदासाठी इच्छुक असलेल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, या भरतीमुळे शैक्षणिक विकासालाही चालना मिळणार आहे. सध्या ही पदे रिक्त असल्याने कॉलेजेसमध्ये अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
https://twitter.com/MahaDGIPR/status/1458441494474346508