नाशिक: एमईटी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, भुजबळ नॉलेज सिटी महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्राध्यापिका डॉ. नीलम दशपुत्रे -मोराणकर यांना नुकतेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाकडुन पीएचडी पदवी प्रदान करणात आली. डॉ. नीलम यांनी मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी,यमुनानगर, निगडी पिंपरी पुणे महाविद्यालयात संशोधन करून पीएचडी पदवी प्राप्त केली. त्यांना डॉ. दीप्ती बंदावणे, विभाग प्रमुख, मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच त्यांना मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.डी.चौधरी आणि एमईटी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.जे. क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले. फार्माकोलॉजी विषयात इवलुएशन ऑफ सम मेडिसिनल प्लांट्स फॉर इम्युनोमोड्युलेटरी ऍक्टिव्हिटी इन व्हेरियस ऍनिमल मॉडेल्स यात त्यांनी संशोधन केले. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतर्राष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधन सादर केले. तसेच अनेक शोध निबंध देखील प्रकाशित केले. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.