इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान तिच्या स्टायलिश लूकसाठी ओळखली जाते. शाहरुखची बायको म्हणून नाही तर गौरी खानचा स्वतंत्र एक वेगळा चाहतावर्ग आहे. फॅशन सेन्समुळे गौरी अनेकदा चर्चेत असते. पन्नाशी ओलांडल्यानंतरही गौरी खान खूपच स्टायलिश दिसते. गौरी खान आज कोट्यवधींची मालकीण आहे.
दिल्ली विद्यापीठांतर्गत लेडी श्रीराम कॉलेजमधून तिने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं आहे. २०१८ मधील ‘फॉर्च्यून इंडिया’ मॅगझिनच्या टॉप ५० पॉवरफुल महिलांच्या यादीत गौरीचा समावेश आहे. आज गौरी कोट्यवधींची मालकीण आहे. एवढेच नव्हे तर किंग खानच्या यशात गौरीचा मोठा वाटा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान आणि गौरी खानकडे ७३०४ कोटींची संपत्ती आहे.
बॉलीवूडचा किंग खान अशी ओळख असलेला शाहरुख खान याचे गौरीवर खूप प्रेम आहे. शाहरुख गौरीच्या प्रेमात वेडा झाला होता. तिच्यासोबत लग्न करण्यासाठी त्याने धर्मदेखील बदलला. शाहरुख आणि गौरी यांनी एक, दोन नव्हे तर तीनदा लग्न केलं आहे. शाहरुख मुस्लिम होता आणि गौरी ब्राह्मण होती. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.
शाहरुख खानची पत्नी असली तरी गौरीने स्वतःच्या आवडीनुसार आपले करिअर निवडले आहे. गौरी खान एक प्रसिद्ध वास्तुविशारद आहे. तिने ‘मन्नत’ सजवण्यासोबतच अनेक बॉलिवूड सुपरस्टार्सची घरे आणि बंगले सजवले आहेत. इंटिरियर डिझायनरसोबतच रेड चिलीज प्रॉडक्शन हाऊसची सह-निर्माती आहे. रेड चिलीजच्या बॅनरखाली तिने ‘डार्लिंग्स’, ‘मैं हूं ना’, ‘ओम शांती ओम’, ‘माय नेम इज खान’, ‘हॅपी न्यू इयर’, ‘चेन्नई एक्सप्रेस’ या सुपरहिट सिनेमांची निर्मिती केली आहे. गौरी स्वतः १६०० कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. गौरीचे रेड चिलीज एंटरटेनमेंट हे प्रोडक्शन हाऊस बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारे प्रॉडक्शन हाऊस मानले जाते. गौरीचं स्वतःचं लक्झरी दुकान आहे. या दुकानाची किंमत १५० कोटी आहे.
Producer and Interior Designer Gauri Khan Life Journey