नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुलीचा मान व जावयाला वाण अशा या धोंड्याच्या महिन्याला आता आधुनिक झालर मिळाली असली तरी नाशिकच्या बांधकाम व्यावसायिक गौतम कांतीलाल हिरण यांनी तो पारंपारिक पध्दतीने मराठमोळया थाटात हे पर्व आज साजरे केले. या सोहळ्यात सजावट केलेल्या सहा बैलगाड्यातून जावई व मुलीची आज मिरवणूक काढण्यात आली. लेझिम पथक, हलगी, टाळ – मृंदुगाचा गजरही यावेळी झाला. रवी शंकर मार्गावरील शुभ भाग्य या बंगल्या जवळ सकाळी १० वाजेपासून जावई व मुलीची मिरवणूक काढण्यात आली.
या हटके सोहळ्यात मुली व जावयासाठी मराठमोळा ड्रेस कोडही होता. जावयाने धोतर, कुर्ता व टोपी परिधान केले होते. मुलगीने नववारीचा शृंगार केला होता. यावेळी या दोघांचे स्वागतही वेगळ्या पध्दतीने करण्यात आले. त्याचबरोबर रस्त्यावर रांगोळी व फुलांची सजवाट करण्यात आली होती. या सोहळ्यात भविष्य सांगणारा लक्षवेधी होता. तर मेंहदीचा सोहळाही येथे रंगला या सोहळ्यासाठी हिरण कुटुंबियातील मुलगी, तीन आत्या, १३ बहिणी व सर्व जावई आले होते.
या हटके सोहळ्याबाबत बोलतांना गौतम कांतीलाला हिरण यांनी सांगितले की, आपली भारतीय संस्कृती आपण जपली पाहिजे. नवीन पिढीला ती समजावी यासाठी थोडं वेगळ करण्याचा निर्णय घेतला. खरं तर ३३ महिन्यांनंतर अधिकचा महिना येत असतो. यावेळी मुलीचा मान व जावयाला वाण दिले जाते. त्यामुळे हा सोहळा आम्ही वेगळ्या पध्दतीने साजरा केला.
Procession of daughter and son-in-law in a decorated bullock cart in NAShik https://fb.watch/modrgY4_ra/