मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन या अवताराने सध्या चांगलाच हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक हजारोने वाढत आहे. त्यामुळे सध्या चिंतेचे वातावरण आहे. तर, या कोरोना विरोधी लढ्यात केंद्र सरकारने एक पुढाकार घेतला आहे. त्यानुसार फ्रंटलाईन वर्कर्स आणि ६० वर्षे वयापुढील ज्येष्ठ नागरिकांना तिसरा डोस देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, ज्यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत त्या सर्वांनाच सध्या तिसऱ्या डोसची उत्सुकता लागली आहे. तो केव्हा आणि कसा मिळेल असे प्रश्न विचारले जात आहेत. त्याविषयीच आपण आता जाणून घेऊ
कोविन या सरकारी अॅपने एक उत्तम संधी निर्माण केली आहे. आपल्याला तिसरा डोस घ्यायचा असेल तर खालील प्रक्रिया पूर्ण करा
१. सर्वप्रथम खालील वेबसाईटवर जा
https://selfregistration.cowin.gov.in/
२. तेथे आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकावा लागेल. (जो नंबर आपण यापूर्वी दोन डोस घेताना दिला आहे)
३. आपल्या मोबाईलवर ओटीपी येईल
४. ओटीपी टाका
५. व्हेरिफाय अँड प्रोसिड यावर क्लिक करा
६. नवी विंडो ओपन होईल. त्यात आपल्याला दिसेल की आपण यापूर्वी किती डोस घेतले आहेत. तसेच, उजव्या बाजूला लाल रंगात आपल्याला एक माहिती दिसेल. ती म्हणजे, तिसऱ्या डोससाठी आपल्याला किती दिवस बाकी आहेत. तसेच डाव्या बाजूला खाली आपल्याला दिसेल की तिसऱ्या डोसची अंतिम तारीख काय आहे.
७. आपल्याला तिसरा डोस घ्यायचा असेल आणि स्लॉट बुक करायचा असेल तर बुक स्लॉट या पर्यायावर क्लिक करावे
८. नवी विंडो ओपन होईल. तेथे आपल्याला सर्च बाय डिस्ट्रि्क्ट असा पर्याय दिसेल. तेथे आपले राज्य आणि जिल्हा निवडा. सबमिट केल्यावर आपल्याला स्लॉट बुक करता येईल