इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभेत आज पहिल्यांदाच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी जोरदार भाषण केले. आपल्या या पहिल्याच भाषणात त्यांनी ईव्हीएम वर प्रश्न उपस्थित करत बॅलेटरवर मतदान करा, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल असे सांगितले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, गोव्याचं सरकार पाडण्याचं काम कोणी केलं असा सवालही केला. सरकार पाडण्यासाठी मोठ्या पैशाचा वापरही करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
यावेळी त्या म्हणाल्या की, आम्ही संसदेत हिमाचल प्रदेशबद्दल बोललो तेव्हा भाजपच्या लोकांना धक्काच बसला. पण सत्य हे आहे की आज सफरचंदाची शेती, सफरचंद कोल्ड स्टोरेज, सफरचंद बाजार, सफरचंद गोदाम आणि सफरचंदाच्या किमती सर्व काही अदानींच्या हातात आहे. ते सर्व काही ठरवत आहेत आणि सफरचंद शेतकरी रडत आहेत.
सर्व व्यवसाय, सर्व संसाधने, सर्व संपत्ती, सर्व संधी एकाच व्यक्तीकडे सोपवल्या जात आहेत. सर्व बंदरे, विमानतळ, रस्ते, रेल्वे, कारखाने, खाणी, कंपन्या, सर्व काही एका व्यक्तीच्या हाती दिले जात आहे. सर्व नियम आणि कायदे एकाच व्यक्तीसाठी बनवले जात आहेत असे सांगत त्यांनी उद्योगपती गौतम अदाणी यांच्यावर निशाणा साधला….
बघा व्हिडिओमध्ये संपूर्ण भाषण