मुंबई – बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा निक जोनासशी लग्न केल्यानंतर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अनेकदा दोघांचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. चाहत्यांनाही ते खूप आवडतात. मात्र, गेल्या दोन दिवसांपूर्वी प्रियांका आणि निकच्या घटस्फोटाच्या बातम्या सोशल मीडियावर पसरल्या होत्या. कारण प्रियंका चोप्राने तिच्या सोशल मीडिया हँडलवरून जोनास हे आडनाव काढून टाकले होते, त्यानंतर युजर्समध्ये अशी चर्चा होती की, प्रियांका आणि निक लवकरच घटस्फोट घेणार आहेत. परंतु प्रियंकाने या केवळ अफवा असल्याचे म्हणत खुलासा केला आहे की, मी पासून मला कोणीही चोरु शकत नाही. फक्त एक व्यक्ती आहे, जी मला त्याच्यापासून चोरू शकत नाही! कोण आहे ती व्यक्ती जाणून घेऊ या…
अभिनेत्री प्रियांका आणि तिची आई मधु चोप्रा या दोघांनीही याचा स्पष्ट इन्कार केला आहे. निक आणि प्रियांका त्यांच्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी असल्याचे त्याच्या मित्रांनीही सांगितले. प्रियांका नेटफ्लिक्स वर जोनास ब्रदर्स फॅमिली रोस्टमध्ये दिसली. यादरम्यान प्रियांकाने तिच्या लग्नासह अनेक गोष्टींचा खुलासा केला.
प्रियांकाने सांगितले की, तिने निकशी लग्न केले तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले होते, तसेच अनेकांना हा पब्लिसिटी स्टंट असल्याचेही वाटले. मात्र पूर्वी निक हा किती प्रसिद्ध आहे हे मला माहीत नव्हते, तर ती निकला केविनचा धाकटा भाऊ म्हणून ओळखत होती. मात्र, दरम्यानच्या काळात जेव्हा दोघे भेटले तेव्हा लगेचच त्यांच्यातील केमिस्ट्री दिसली, त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
प्रियांकाने अनेकवेळा मुलाखतींमध्ये खुलासा केला आहे की, तिला निकशिवाय इतर कोणाशीही लग्न करायचे नव्हते. तथापि, तिने असेही सांगितले की, जगात फक्त एकच व्यक्ती आहे, जी तिला निकपासून चोरू शकते. तो म्हणजे हॉलिवूडचा सुपरगॉड थॉर म्हणजेच ख्रिस हेम्सवर्थ तिला निकपासून चोरू शकतो. मात्र त्याच वेळी प्रियंकाने सांगितले की, ख्रिस हेम्सवर्थचे लग्न एल्साशी झाले असून ते खूप यशस्वी आणि सुंदर जोडपे मानले जाते. मात्र, ख्रिस हेम्सवर्थबाबत तरूण मुलींमध्ये ज्या प्रकारे क्रेझ पाहायला मिळते, त्यावर प्रियांकाचे म्हणणे चुकीचे वाटत नाही.
थॉर या चित्रपटात थॉरची भूमिका साकारणाऱ्या ख्रिस हेम्सवर्थने आपल्या अभिनयाने आणि देखण्या लूकने सर्वांनाच वेड लावले आहे. मात्र प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी 2018 मध्ये राजस्थानच्या जोधपूरमध्ये शाही पद्धतीने लग्न केले. यादरम्यान दोघेही हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार एकत्र येताना दिसले. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाले होते. आता ते दोघे आपल्या वैवाहिक जीवनात पैशा असल्याचेही प्रियंका हिने सांगितले.