मुंबई – प्रसिद्ध सेलिब्रिटी प्रियंका चोप्रा ही चांगली अभिनेत्री आहेच, शिवाय यशस्वी उद्योजकही आहे. प्रियंकाने आपल्या मेहनतीच्या मिळकतीतून भारतासह परदेशात स्थावर मालमत्ता खरेदी केलेली आहे. मुंबईसह गोवा आणि न्यूयॉर्कमध्ये तिची मालमत्ता आहे. प्रियंकाने आता यापैकी काही मालमत्तांची विक्री केली आहे. तर काही मालमत्ता भाडेतत्वावर दिल्या आहेत. मुंबईतील वास्तू प्रोजेक्ट प्रकल्पातील दुसर्या मजल्यावरील कार्यालय तिने भाडेतत्वावर दिले आहे. कार्यालयाचे भाडे आहे, २ लाख ११ हजार रुपये!
प्रियंकाने तिच्या दोन मालमत्तांची ७ कोटी रुपयांमध्ये विक्री केली आहे. एक घर तीन कोटी रुपयांमध्ये विकले आहे. तर दुसर्या घराची किंमत चार कोटी आहे. घरांचे नोंदणीचे शुल्क ९ आणि १२ लाख रुपये आहे. तत्पूर्वी प्रियंकाने २०२० मध्ये एक घर दोन कोटी रुपयांनी विकले होते. गोव्यामधील बागा चौपाटीवर प्रियंकाचा एक सुंदर बंगला आहे. तसेच कॅलिफोर्नियामध्ये अँटिनो नावाच्या बंगल्यात ती पती निक जोनससोबत राहते. हा बंगला २० हजार कोटींचा असल्याचे बोलले जात आहे.
प्रियंका चोप्रा चित्रपट अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिचे अनेक चित्रपट हिट झाले आहेत. तसचे ती सोशल मीडियावरही खूपच सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. त्यामुळे चाहते नेहमीच उत्साहित असतात. तिने काही दिवसांपूर्वी गायक निक जोनससोबत लग्न केले होते. हॉलिवूड चित्रपटात अभिनेता म्हणूनही निक प्रसिद्ध आहे.