मुंबई – अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि गायक निक जोनस जागतिक स्तरावर प्रसिद्ध सेलिब्रिटी आहेत. आपले प्रेम जाहीररित्या व्यक्त करण्यात ते अजिबात संकोच बाळगत नाहीत. प्रियंकाच्या बोल्ड अंदाजामुळे ती नेहमीच चर्चेत असते. मात्र प्रियंकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बिकनीवर शेअर केलेल्या फोटोवर तिची बहीण परिणितीने प्रतिक्रिया दिली आहे.
सुमद्राच्या किना-यावर प्रियंका ऊन घेताना दिसत आहे. तिने लाल रंगाची बिकनी परिधान केली आहे. तिच्याजवळ शर्टलेस निक जोनस बसलेला आहे. प्रियंकाचे फोटो पाहून तिच्या हॉट लूकवर खूप प्रतिक्रिया येत आहेत. काही जण कौतुक तर, काही ट्रोल करत आहेत. याचदरम्यान, प्रियंकाची बहीण परिणिती चोप्राने तिच्या फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे.
हा फोटो केला शेअर
प्रियंकाने आपल्या फोटोवर कॅप्शन दिले आहे ‘स्नॅक’. सोबत काटे आणि चाकूची इमोजी पोस्ट केली आहे. तर निकने एका हातात काटा आणि एका हातात चाकू घेतलेला दिसत आहे.
परिणितीची प्रतिक्रिया
फोटोवर प्रियंकाची चुलत बहीण परिणिती चोप्राने दिलेल्या प्रतिक्रियेकडे सर्वांचेच लक्ष वेधले गेले. परिणिती म्हणते, “जीज, मिमीृ दिदी, काय सुरू आहे? इन्स्टाग्रामवर आपले कुटुंब आहे. मी डोळे बंद करून हिट बटन लाइक करण्याचा प्रयत्न केला आहे”.
आगामी चित्रपट
परिणिती आणि प्रियंका चोप्रा दरम्यान खूपच चांगली बाँडिंग आहे. दोघीही अनेक वेळा एकसाथ वेळ घालविताना दिसल्या आहेत. दोघींच्या चित्रपटांच्या बाबतीत बोलल्यास परिणिती संदीप आणि पिंकी फरार आणि साइना या चित्रपटात दिसली होती. आगामी चित्रपटात ती दिग्दर्शक रिभू दास गुप्ता यांच्यासोबत काम करणार आहे. चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही.
प्रियंका गेल्या काही दिवसांपासून लंडनमध्ये सिटाडेल या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र होती. या वीकेंडला ती अमेरिकेत पोहोचली आहे. तिने निक जोनससोबत एका कॉन्सर्टमध्येही सहभाग घेतला. सिटाडेट याचित्रपटाशिवाय प्रियंका जी ले जरा आणि मॅट्रिक्स-४ या चित्रपटांमध्येही काम करत आहे.