विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांची शाळेची फी, बस फी माफ करण्याचा निर्णय छत्तीसगड येथील खाजगी शाळांनी घेतला आहे. या निर्णयाचा मोठा फायदा अत्यंत गरजू विद्यार्थ्यांना होणार आहे. अशाच प्रकारचा मनाचा मोठेपणा महाराष्टातील खासगी शाळांनीही दाखवावा, असे आवाहन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले आहे. महाराष्ट्रातील खासगी शाळांनी कोरोना बाधित पाल्यांना असाच दिलासा द्यावा. त्यांची सर्वच फी शाळांनी माफ करावी, अशी मागणी नांदगावकर यांनी केली आहे. खासगी शाळा जर असा निर्णय घेत नसतील तर किंबहुना राज्याच्या शिक्षण मंत्र्यानी सरसकट तसे आदेशच दयावेत, असेही नांदगावकर यांनी म्हटले आहे. कोरोना संकटामुळे अनेक कुटुंबांची वाताहत झाली आहे. काही कुटुंबांमध्ये तर पालकांचा मृत्यू झाल्याने लहान मुले अनाथ झाली आहेत. त्यांच्या शिक्षणाचा प्रश्नही निर्माण झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकीच्या नात्याने खासगी शाळांनी पुढाकार घ्यावा, असे नांदगावकर यांनी म्हटले आहे.
कोरोना ने पालक गमावलेल्या मुलांची शाळेची फी,बस फी यावर्षी सर्वच शाळांनी माफ करावी. किंबहुना शिक्षण मंत्र्यानी सरसकट तसे आदेशच दयावेत. छत्तीसगड येथील खाजगी शाळांनी मनाचा मोठेपणा दाखवत तसा निर्णय घेतला आहे.@CMOMaharashtra @VarshaEGaikwad @TV9Marathi @zee24taasnews @abpmajhatv
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) May 18, 2021