इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – खासगी क्षेत्रातील धनलक्ष्मी बँकेच्या व्यवस्थापनात मोठे वादळ उठले आहे. किंबहुना, काही भागधारकांनी बँकेचे एमडी आणि सीईओ शिवन जेके यांची खरडपट्टी काढण्यासाठी एक्स्ट्राऑर्डिनरी जनरल मीटिंग (EGM) बोलावण्यात आली आहे. मुंबई स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत, बँकेने सांगितले आहे की, ही बैठक सुमारे १३% हिस्सेदारी असलेल्या नऊ भागधारकांच्या गटाने बोलावली आहे.
हे भागधारक बैठकीत शिवन जेकेचे अधिकार कमी करण्याचा प्रस्ताव देतील, त्याशिवाय दोन अन्य संचालकांना अधिकृत करतील. १२ नोव्हेंबर ही बैठकीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. बँकेत सुमारे १३% भागधारक असलेल्या भागधारकांमध्ये अब्जाधीश बी रवींद्रन पिल्लई यांचाही समावेश आहे, ज्यांच्याकडे ९.९९% हिस्सा आहे. यासंदर्भात बँकेने कायदेशीर मत घेतल्याचे म्हटले आहे. बँकेने म्हटले आहे की, आम्ही बैठकीसाठी बंधनकारक आहोत. परंतु भागधारक एमडी आणि सीईओंच्या अधिकारांवर बंधन घालू शकत नाहीत. सीईओंच्या अधिकारात कपात करण्याचा अधिकार फक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आहे.
भागधारकांनी सीईओ शिवन जेके यांच्या खर्चाच्या पद्धतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भागधारकांच्या मते, बँकेविरुद्ध टाळता येण्याजोग्या खटल्यासाठी उच्च किमतीच्या वकिलांची नियुक्ती करणे असो किंवा नवीन कामगारांची भरती करण्यासाठी मोठ्या प्रोत्साहनाचा दावा करणे असो, सर्वत्र बेहिशेबी आहे. बँकेच्या नवीन शाखा सुरू करण्यासाठीही मोठा खर्च झाला आहे.
भागधारकांचा आरोप आहे की, धनलक्ष्मी बँकेचा कारभार छोट्या बोर्डाने चालतो. त्यात एमडी व्यतिरिक्त फक्त दोन संचालक आहेत. बँकेने ऑगस्ट २०२० पासून नवीन संचालकाची नियुक्ती केलेली नाही. बँकेतील संचालकांच्या नियुक्तीबाबत भागधारकांसोबतचा प्रलंबित कायदेशीर वाद सोडवण्यासाठी सीईओ पुढाकार घेण्यास अपयशी ठरले आहेत. बँकेला भांडवलाची नितांत गरज आहे. भागधारकांना भांडवल उभारणीच्या कोणत्याही योजनेची माहिती देण्यात आलेली नाही, परंतु त्यांना अंधारात ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, धनलक्ष्मी बँकेच्या व्यवस्थापनात यापूर्वीही असा वाद झाला होता. बँकेचे माजी सीईओ सुनील गुरबक्सानी सप्टेंबर २०२० मध्ये शेअर होल्डरसोबतच्या मतभेदामुळे बाहेर पडले होते. त्यानंतर शिवन जेके यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. सिवन यांनी यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये काम केले आहे.
Private National Bank Issue Share Holder Meeting