इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नेटफ्लिक्स कंपनीने १५० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकल्यानंतर आता आणखी एका कंपनीतील बाब समोर आली आहे. ऑनलाइन एज्युकेशन युनिकॉर्न वेदांतूने 424 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे. एकूण कर्मचाऱ्यांच्या हे प्रमाण अंदाजे ७ टक्के आहे. वेदांतूचे सीईओ वामसी कृष्णा यांनी ई-मेलद्वारे ही माहिती दिली आहे.
सीईओ वामसी कृष्णा यांच्या मते, सध्या बाह्य वातावरण अडचणींनी भरलेले आहे. युरोपातील युद्ध, मंदीची भीती आणि फेडने व्याजात केलेली वाढ यामुळे केवळ जागतिक नव्हे तर भारतातही महागाई वाढली आहे. हे वातावरण पाहता आगामी तिमाहीत परिस्थिती कठीण होणार आहे. अशा परिस्थितीत आमच्या काही सहकाऱ्यांना कंपनी सोडण्यास सांगितले जाईल.
कर्मचार्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये वामसी कृष्णा म्हणाले, “हे सांगण्याचा कोणताही सोपा मार्ग नाही. हा एक कठीण निर्णय आहे आणि हा निर्णय का घेतला गेला आहे आणि वेदांतूच्या भविष्यासाठी प्रत्येक कर्मचार्याने समजून घ्यावे अशी माझी इच्छा आहे.” त्याचा त्याच्यासाठी काय अर्थ आहे?”
टायगर ग्लोबल-समर्थित शैक्षणिक क्षेत्रातील युनिकॉर्न वेदांतूची ही दुसरी टाळेबंदी आहे. याआधी तिने २०० कर्मचाऱ्यांपैकी ३.५ टक्के कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.