मुंबई – मोबाईलचा वापर जगभरात प्रचंड प्रमाणात वाढला आहे अगदी त्याचा विस्फोट व्हावा, असा अमर्याद वापर वाढल्याने त्यातून अनेक बऱ्या-वाईट घटना घडत असतात. आपल्या खासगी जीवनातील गोष्टीदेखील या मोबाईल मधील वेगवेगळ्या अॅपमुळे उघड होऊ शकतात. परंतु याची काळजी घेणारी स्मार्टफोन तंत्रज्ञानामधील अत्याधुनिक कंपनी अॅपलने नवीन फिचर आणले आहे. त्यामुळे मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकाची प्रायव्हसी काही प्रमाणात सुरक्षित होऊ शकते, असे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे.
0अॅपल आपल्या यूजरच्या प्रायव्हसीला खूप गांभीर्याने घेते. एका नवीन अहवालानुसार, कपर्टिनो-आधारित टेक जायंटने iOS, 15.2 बीटा अपडेटमध्ये ‘अॅप प्रायव्हसी’ रिपोर्ट हे वैशिष्ट्य आणले आहे. नवीन अपडेट वापरकर्त्यांना त्यांच्या आयफोनवर कोणत्या प्रकारच्या वैयक्तिक डेटा अॅप्सने प्रवेश केला आहे हे जाणून घेण्यास अनुमती देईल. ‘अॅप प्रायव्हसी’ अहवाल कोणत्या अॅपने गेल्या सात दिवसांत लोकेशन, फोटो, कॅमेरा, मायक्रोफोन आणि कॉन्टॅक्ट्स यासारखी संवेदनशील माहिती ऍक्सेस केली आहे हे दर्शवेल.
अॅपलने iOS 15.2 आणि iPadOS 15.2 चा पहिला बीटा चाचणीच्या उद्देशाने विकसकांसाठी सीड केला आहे, त्यात अॅप प्रायव्हसी रिपोर्ट सारख्या iOS ,15 वैशिष्ट्यांचा दावा केला आहे, मॅकरुमर्सच्या अहवालात म्हटले आहे की, अॅपने इतर कोणत्या वेब डोमेनशी संपर्क साधला आहे हे देखील अहवाल दर्शवेल आणि अॅपमध्ये थेट भेट दिलेल्या वेबसाइटशी त्याची तुलना करू शकता. या वर्षीच्या अॅपल ‘WWDC’ डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये ‘अॅप प्रायव्हसी’ अहवाल प्रथम प्रदर्शित करण्यात आला. हा अहवाल iOS 15.2 बीटामध्ये सेटिंग्ज अॅपच्या गोपनीयता विभागात उपलब्ध आहे.
सदर अहवाल हा अशा वेळी आला आहे की, जेव्हा iOS अॅप स्टोअरचे गोपनीयता धोरण फेसबुक आणि स्नॅप सारख्या मोठ्या टेक कंपन्यांमध्ये चांगले सांभाळले जात नाही, कारण त्यांचे व्यावसायिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जाहिरात ट्रॅकिंग पारदर्शकता वैशिष्ट्यास दोष दिला जात आहे. iOS अॅप स्टोअर गोपनीयता लेबल समायोजित करण्यासाठी Google ला सुमारे दोन महिने लागले. अहवालात म्हटले आहे की, iOS 15.2, संप्रेषण सुरक्षा वैशिष्ट्याद्वारे, मुलांच्या डिव्हाइसवरून लैंगिक गोष्टी संबंधीचे फोटो प्राप्त होता म्हणजे येतात किंवा पाठवले जातात. तेव्हा या संदर्भात मुले आणि त्यांच्या पालकांना देखील सूचना दिली जाईल.