मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोणताही ऐतिहासिक चित्रपट म्हटला की, त्यामध्ये भव्यदिव्यता असते. त्याचप्रमाणे त्या काळातील युद्ध असो की अन्य कोणतेही प्रसंग सादर करताना चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यांची मोठी कसोटी लागते. इतकेच नव्हे या चित्रपटातील कलाकारांची वेशभूषा – केशभूषा करताना मोठी काळजी घ्यावी लागते. सध्या देखील अशाच एका आगामी चित्रपटाचा सर्वत्र बोलबाला सुरू आहे.
यशराज फिल्म्सचा पहिला ऐतिहासिक चित्रपट ‘पृथ्वीराज’च्या प्रदर्शनाची तयारी सुरू झाली आहे. हिंदी व्यतिरिक्त हा चित्रपट तेलगू आणि तामिळ भाषेत दि. ३ जून रोजी प्रदर्शित होत असून त्यासाठी देश-विदेशातील चित्रपटगृहांचे बुकिंग जवळपास पूर्ण झाले आहे. चित्रपटाच्या निर्मितीचे अनेक किस्से बाहेर येत असतानाच चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी आपला संपूर्ण अनुभव आणि ज्ञान पणाला लावल्याचे समजते.
‘चाणक्य’ ही हिंदी मनोरंजन जगतातील सर्वोत्कृष्ट मालिका बनवणारे डॉ. द्विवेदी म्हणतात की, या चित्रपटासाठी जेवढे कपडे तयार करण्यात आले आहेत, त्यात देशातील सुमारे ५०० भव्य अशा विवाहसोहळ्यांची सजावट करता येईल. ‘पृथ्वीराज’ चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. डॉ. द्विवेदी म्हणतात, ‘पृथ्वीराज’ चित्रपटात आम्ही इतिहासाला खऱ्या अर्थाने रचण्याचा प्रयत्न केला आहे.
इतिहासातील कथेवर चित्रपट बनवायचा असेल तर त्याच्या बारकाव्यांकडे लक्ष देणंही खूप गरजेचं होतं. केवळ काही लोकांनाच माहिती आहे की राजस्थानमध्ये, पगडी विशिष्ट स्थानाचे प्रतीक आहे आणि समाजातील विशिष्ट व्यक्तीची स्थिती देखील आहे. या चित्रपटासाठी आम्ही बनवलेल्या पगड्यांची संख्या पाचशेहून अधिक आहे. राजांच्या पगड्या वेगळ्या असतात. नागरिकांच्या पगड्या वेगळ्या असतात. सरदारांच्या पगड्या वेगळ्या आणि कारागिरांच्या पगड्या वेगळ्या. यासाठी आम्ही उपलब्ध छायाचित्रांच्या हुबेहुब प्रतिकृती बनवल्या. असे असतानाही राजस्थानातील पगडी तज्ज्ञ नेहमी सेटवर हजर असायचे आणि या पगड्या सजवण्याचे काम त्यांच्या देखरेखीखाली केले जात असे.
पगडीनंतर तीच गोष्ट चित्रपटातील कलाकारांच्या कपड्यांबाबतही येते. डॉ. द्विवेदी म्हणतात, ‘चित्रपटाच्या कॉस्च्युम डिझायनरने ‘पृथ्वीराज’ चित्रपटासाठी इतके कपडे बनवले आहेत की, देशातील सर्वात भव्य मिरवणुकांच्या किमान पाचशे मिरवणुका त्या सजवता येतील. मोजणी केली तर या सर्व कपड्यांची संख्या ५० हजारांहून अधिक आहे. राजस्थानातील कारागीर आणि राजपूती अभिमानावर लक्ष ठेवणारे नागरिक मुंबईत आले आहेत आणि त्यांनी हे सर्व पोशाख तयार केले आहेत. मला आनंद आहे की मला या चित्रपटासाठी आदित्य चोप्रासारखा निर्माता मिळाला आणि ज्याने माझ्या कल्पनेत रंग भरण्यास मागेपुढे पाहिले नाही.’
अभिनेता अक्षय कुमारचा असा विश्वास आहे की डॉ द्विवेदींच्या कल्पनेने “पृथ्वीराज” चित्रपटाला भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. तो म्हणतो, ‘क्वचितच एखाद्या चित्रपटात एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम केले जाते की तो कायम लक्षात राहील. सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित ‘पृथ्वीराज’ चित्रपटातील प्रत्येक पैलू पूर्ण प्रामाणिकपणाने, सच्चेपणाने आणि आदराने मांडण्यात आला आहे. सम्राट पृथ्वीराज यांची जीवनकहाणी मोठ्या पडद्यावर अत्यंत प्रेक्षणीय पद्धतीने रसिक प्रेक्षकांसमोर यावी, अशी आमची इच्छा असल्याने चित्रपट बनवताना आम्ही छोट्या-छोट्या गोष्टींकडे पूर्ण लक्ष दिले आहे.
शौर्य और वीरता की अमर कहानी… यह है कहानी सम्राट पृथ्वीराज चौहान की ।
Releasing in Hindi, Tamil and Telugu. Celebrate Samrat #Prithviraj Chauhan with #YRF50 only at a theatre near you on 3rd June. pic.twitter.com/rHF24WTyPl— Akshay Kumar (@akshaykumar) May 9, 2022