मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय संघाचा खेळाडू पृथ्वी शॉच्या कारवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत कारवर काही अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. पृथ्वी शॉने सेल्फी काढायला नकार दिल्याने आठ जणांच्या जमावाने त्याच्या कारवर बेसबॉल स्टीकने हल्ला केला. मुंबईतील ओशिवरा पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे.
संबंधित कारमध्ये पृथ्वी शॉ असल्याचा समज करून घेऊन आरोपींनी आशिष यादव यांच्या कारवर हल्ला केला. याबाबतची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तपास सुरू केला. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार पृथ्वी शॉ सहारा स्टार हॉटेल मुंबई येथे असताना आरोपी सना गिल आणि शोबित ठाकूर क्रिकेटपटू पृथ्वी शॉकडे सेल्फी घेण्यासाठी पोहोचले. आशिष यादवने याबाबत पोलिसांना सांगितले की, दोन्ही आरोपींनी पृथ्वी शॉसोबत सेल्फी घेतली. त्यानंतर दोघांनीही पुन्हा एकदा सेल्फी घेणयासाठी पृथ्वीला सोबत येण्यास सांगितले. मात्र त्याने नकार दिला. त्यानंतर हॉटेलच्या मॅनेजरने या दोघांनाही बाहेर काढले. या घटनेमुळे हे दोन्ही आरोपी संतप्त झाले. त्यांनी हॉटेलमधून बाहेर पडलेल्या पृथ्वी शॉच्या कारचा पाठलाग सुरू केला.
नेमके काय घडले?
पृथ्वी शॉची कार जोगेश्वरी लिंक रोडवरील पेट्रोल पंपावर आली असताना आरोपींनी ही कार समोरून अडवली. त्यानंतर बेसबॉलच्या बॅटने कारच्या काचा फोडल्या. त्या कारमधून पृथ्वी शॉचा मित्र आशिष यादव, ड्रायव्हर आणि आणखी एक व्यक्ती प्रवास करत होती. तर पृथ्वी शॉ अन्य कारने निघून गेला होता.
पन्नास हजाराची मागणी
प्रकरण दाबायचे असल्यास ५० हजार रुपये दे, अन्यथा एखाद्या खोट्या केसमध्ये तुम्हाला अडकवू, अशी धमकीही आरोपींनी दिल्याचे पृथ्वी शॉच्या मित्रांनी सांगितले. त्यानंतर पृथ्वीचा मित्र काचा फुटलेल्या कारसह ओशिवरा पोलिस ठाण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आयपीसी कलम ३८४, १४३, १४८, १४९, ४२७. ५०४ आमि ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
Kalesh B/w Prithvi Shaw And Influencer Sapna Gill on Roadpic.twitter.com/QI88XpqHuX
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) February 16, 2023
Prithvi Shaw Car Attacked in Mumbai for This Reason