रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बनावट भारतीय चलनी नोटा छापणारी ७ मॉड्यूल्स उघडकीस…नऊ जणांना अटक

by India Darpan
फेब्रुवारी 21, 2025 | 11:25 pm
in संमिश्र वार्ता
0
jail1

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सिक्युरिटी पेपर आयात आणि बनावट भारतीय चलनी नोटा छापणाऱ्या मॉड्यूल्सविरुद्धची मोहीम सुरू ठेवत, डीआरआय,अर्थात महसूल गुप्तचर महासंचालनालयाने 20 फेब्रुवारी 2025 रोजी, महाराष्ट्र, हरियाणा, तेलंगणा, तामिळनाडू आणि बिहारमधील 11 वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आणि बनावट भारतीय चलनी नोटा छपाईत सहभागी असलेली आणखी सात (7) मॉड्यूल्स उघडकीस आणली.

या प्रकरणात, मुंबईतील विक्रोळी पश्चिम येथे, डीआरआयने सिक्युरिटी पेपर आयातदाराची ओळख पटवून शोध घेतला. दाट लोकवस्ती असलेल्या परिसरात कसून शोध घेतल्यानंतर, बनावट भारतीय नोटा छापण्यासाठी करण्यासाठी एक अत्याधुनिक ठिकाण उघडकीस आले आणि 50 आणि 100 रुपयांच्या बनावट नोटा, अनेक यंत्रसामग्री/साधने जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या वस्तूंमध्ये लॅपटॉप, प्रिंटर, पेन ड्राइव्ह, सेक्युरिटी पेपर, A-4 आकाराचे कागद आणि महात्मा गांधींचे वॉटरमार्क असलेले बटर पेपर इत्यादींचा समावेश आहे.डीआरआय अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आणि पोलिस अधिकाऱ्यांनी पुढील तपासासाठी सर्व उपकरणे आणि साधने जप्त केली.

संगमनेर जिल्ह्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात, डीआरआयने बनावट भारतीय चलनी नोटा छापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संगणक आणि प्रिंटरसह अशाच प्रकारचे ठिकाण शोधून काढले. दोन्ही ठिकाणी, डीआरआय अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आणि पुढील तपासासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी प्रतिबंधित सामान जप्त केले.

कोल्हापूर मॉड्यूलमधील आरोपींच्या चौकशीनंतर कोल्हापूर पोलिसांनी बेळगावमध्ये प्रिंटिंग सेट असलेल्या आणखी एका मॉड्यूलचा पर्दाफाश केला आणि या प्रकरणात आणखी तीन जणांना अटक केली.

इतर तीन ठिकाणी (आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्हा; बिहारमधील खगरिया जिल्हा आणि हरियाणामधील रोहतक) सेक्युरिटी पेपरच्या आयातदारांचा शोध घेण्यात आला. पश्चिम गोदावरी येथे प्रतिबंधित सेक्युरिटी पेपर आणि प्रिंटर; खगारिया जिल्ह्यात लॅपटॉप, प्रिंटर आणि प्रतिबंधित सेक्युरिटी पेपर असे गुन्हेगारी पुरावे देखील जप्त करण्यात आले. डीआरआय अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून तिन्ही आरोपींना अधिकारक्षेत्रातील पोलिसांनी अटक केली आहे आणि बीएनएस अंतर्गत पुढील तपास सुरु आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दहावीच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटली? राज्य शिक्षण मंडळाने दिले हे स्पष्टीकरण

Next Post

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह आज पुणे येथे या बैठकीचे अध्यक्षपद भूषवणार

Next Post
amit shah11

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह आज पुणे येथे या बैठकीचे अध्यक्षपद भूषवणार

ताज्या बातम्या

trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
Gt ArXoXMAArHyz e1750556062941

शोलेत अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवली…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

जून 22, 2025
crime1

कारमधून आलेल्या कुटुंबियांनी लाकडी बॅट व लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण…नेमकं घडलं काय

जून 22, 2025
Untitled 71

इस्राएलने केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका…राफेल ग्रोसी

जून 22, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 17.17.54 1024x542 1

सहा रेडिओ जॉकींनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिघ्र कविता करीत गाणेही गायले…

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011